नागपूर: मॅट्रिमोनिअल साइटवर महिला पोलिसाशी मैत्री, लग्नाचं आश्वासन देऊन लॉजवर नेलं... पण शेवटी नको ते घडलं!
नागपूरमध्ये एका मॅट्रिमोनिअल संकेतस्थळाच्या माध्यमातून 25 वर्षीय महिला पोलिसाची संपर्क साधून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मॅट्रिमोनिअल साइटवर महिला पोलिसाशी मैत्री केली अन्...
लग्नाचं आश्वासन देऊन पीडितेची फसवणूक
नागपुरमधील धक्कादायक घटना
Nagpur Crime: नागपूरमध्ये एका मॅट्रिमोनिअल संकेतस्थळाच्या माध्यमातून 25 वर्षीय महिला पोलिसाची संपर्क साधून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. प्रकरणातील आरोपी तरुणाने पीडितेसोबत प्रेमाचं नाटक करून आणि तिला लग्नाचं आमिष दाखवून तिची मोठी आर्थिक फसवणूक केल्याची बातमी समोर आली आहे.
मॅट्रिमोनिअल साइटवर खोटी ओळख सांगून संपर्क...
प्रकरणातील आरोपी तरुण हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचं नाव सूर्यभान फुलारे असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने लग्न जुळवणाऱ्या एका नामांकित मॅट्रिमोनिअल संकेतस्थळावर स्वत:ची अविवाहित वकील अशी खोटी ओळख दाखवून नाव नोंदवलं. याच ओळखीच्या माध्यमातून त्याने नागपूरमध्ये कार्यरत असलेल्या 25 वर्षीय महिला पोलिसाशी संपर्क साधला. त्यानंतर, त्या दोघांमध्ये चॅटिंगद्वारे सतत बोलणं सुरू झालं आणि नंतर, त्यांनी व्हिडीओ कॉलवर बोलण्यास सुरूवात केली. इतकेच नव्हे तर, आरोपी तरुणाने तिच्यासोबत लग्न करण्याचं आश्वासन देखील दिलं.
हे ही वाचा: बीड: रजिस्टर्ड लग्न, नंतर हनीमून सुद्धा झालं... पण लग्नानंतर 5 दिवसांतच नवरीने सासरच्या मंडळींना दिला धक्का!
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळले
त्यानंतर, दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. याच काळात, आरोपी पीडितेला भेटण्यासाठी नागपुरला आला आणि 28 नोव्हेंबर रोजी त्याने महिलेला लग्नाचं आश्वासन देऊन लॉजवर नेलं. त्यावेळी, त्याने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. संतापजनक बाब म्हणजे, संबंध ठेवताना आरोपीने पीडितेचे गुप्तपणे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले. त्यानंतर, ते फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून तब्बल 15 लाख 60 हजार रुपये उकळले.
आरोपीला अटक
महिलेने आरोपीकडे लग्न करण्याचा हट्ट धरला असता त्याने तिला जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली. अखेर, पीडितेला तरुणाचं वागणं असह्य झालं आणि तिने वैतागून लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासादरम्यान, आरोपी तरुण आधीच विवाहित असून त्याला दोन मुलं असल्याचं उघडकीस आलं. 20 डिसेंबर रोजी पोलिसांनी छापा टाकून आरोपीला अटक केल्याची माहिती आहे.










