लातूरच्या उदगीरमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, तीन दिवसांत 22 लोकांचे तोडले लचके
Latur news : राज्यातील लातूरमधील उदगीरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांनी मागील तीन दिवसांमध्ये एक दोन नाहीतर तब्बल 22 लोकांचा चावा घेतला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लातूरमधील उदगीरमध्ये धक्कादायक घटना
दोन्ही मुलांना हल्ल्यातून वाचवले
Latur News : राज्यातील लातूरमधील उदगीरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांनी मागील तीन दिवसांमध्ये एक दोन नाहीतर तब्बल 22 लोकांचा चावा घेतला होता. यामुळे काही लोक गंभीर जखमी झाले होते. या एकूण जखमींमध्ये अनेक मुलं आणि महिलांचा देखील त्यात समावेश होतो. या गंभीर घटनेतील दोन मुलांची नावे समोर आली आहेत, सैयदा नज़रत हाशमी असं जखमीचं नाव आहे.
हे ही वाचा : नाताळ सणादिवशी 'या' राशितील लोकांना मिळणार खरं प्रेम, तर काहींना... जाणून घ्या आजचं राशीभविष्य
भटक्या कुत्र्यांच्या टोळीने दोन मुलांवर प्राणघातक हल्ला करत चावा घेतला
उदगीर शहरातील उदय थिएटर, मुसानगर आणि हनुमान कट्टा रोडवरून जाताना भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला करून जखमी केलं होतं. कुत्र्यांच्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्या व्हिडिओत कुत्र्याच्या टोळीने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन मुलांवर प्राणघातक हल्ला करत चावा घेतला होता.
हे ही वाचा : सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात प्रेयसीसह आईचा पेटवून घेण्याचा प्रयत्न, घटनेनं पुन्हा नांदेड हादरलं
दोन्ही मुलांना हल्ल्यातून वाचवले
या घटनेदरम्यान, काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, नंतर लाठीकाठीने मारहाण केली. तसेच दोन्ही मुलांना हल्ल्यातून वाचवले होते, तसेच त्याचे प्राण देखील वाचवण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या हल्ल्यानंतर, सर्व जखमींना उदगीर शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या भयंकर घटनेनं परिसरातील रहिवासी भटक्या कुत्र्यांना पकडून शहराबाहेरील जंगलात सोडण्याची मागणी करत आहेत.










