Maharashtra Weather : राज्यात 'या' विभागात कडाक्याचं तापमान वाढण्याची शक्यता, पुढील काही तास महत्त्वाचे

मुंबई तक

Maharashtra Weather : काही प्रमाणात उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. काही भागांत अल्पकालीन उन्हाळ्यासरखी स्थिती अनुभवता येऊ शकते. जाणून घेऊयात 12 फेब्रुवारी रोजी हवामानाचा एकूण अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात 12 फेब्रुवारी रोजी प्रामुख्याने कोरडं वातावरण राहण्याची शक्यता

point

जाणून घेऊयात हवामानाचा एकूण अंदाज

Maharashtra Weather : राज्यात 12 फेब्रुवारी रोजी प्रामुख्याने कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. थंडावा कमी जाणवेल, तसेच अधिकचा सूर्यप्रकाश असेल. यामुळे काही प्रमाणात उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. काही भागांत अल्पकालीन उन्हाळ्यासरखी स्थिती अनुभवता येऊ शकते. जाणून घेऊयात 12 फेब्रुवारी रोजी हवामानाचा एकूण अंदाज. 

हे ही वाचा : सातारा जिल्ह्यात पत्नीच्या कथित प्रियकराची हत्या! मृतदेहाशेजारी बसून 191 किमी प्रवास, पोलीस दलातील हवालदाराचं कांड

कोकण :  कोकण विभागातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हवामान कोरडं रहील, तसेच सकाळी हलक्या प्रमाणात थंडावा जाणवेल. तसेच दुपारी उष्णता वाढण्याची शक्यता आहे. समुद्रकिनारी हलके वारे वाहतील असा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र :  पश्चिम महाराष्ट्रात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात 34 अंश सेल्सिअस तापमान राहील.  सांगली आणि कोल्हापूर भागात काही प्रमाणात उकाडा वाढण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री थंडावा, तर दिवसा उन्हाला तडाखा बसण्याची शक्यता आहे.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगरातील जालना, बीड, परभणी, नोंदडमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरात तापमानात काहीअंशी प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान कोरडं आणि उष्ण राहील असा अंदाज आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp