कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा! बीडमधील परीक्षा केंद्रावर पालकांकडून कॉपीचा पुरवठा... ड्रोनमध्ये कैद, आता FIR चे आदेश

मुंबई तक

बीडमधील चौसाळा येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा ड्रोन व्हिडिओ शिक्षण अधिकाऱ्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याची बातमी समोर आली आहे. तसेच, काही पालक खिडक्यांमधून चढून कॉपी पुरवताना दिसले.

ADVERTISEMENT

बीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा!
बीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीडमधील परीक्षा केंद्रावर पालकांकडून कॉपीचा पुरवठा...

point

आता एफआयआरचे आदेश

point

बीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा

बीड: बारावी बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर काल झाला. बीडमधील चौसाळा येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा ड्रोन व्हिडिओ शिक्षण अधिकाऱ्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याची बातमी समोर आली आहे. तसेच, काही पालक खिडक्यांमधून चढून कॉपी पुरवताना दिसले. हा ड्रोन व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

कठोर कारवाई करण्याचे निर्देश

शिक्षण विभागाने हा व्हिडिओ जारी केला असून त्यात परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रकारची बाहेरून मदत किंवा साहित्य पुरवणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचं स्पष्ट केले आहे. असं असूनही, काही लोक नियमांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मुलांना कॉपी पोहोचवताना दिसले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचं गंभीर्य लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत आणि थेट एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. 

हे ही वाचा: Govt Job: 'DRDO' मध्ये सहभागी व्हा! 'डिप्लोमा-डिग्री'धारक उमेदवारांसाठी नवी भरती...

प्रशासकीय देखरेखीबाबत अनेक प्रश्न उपस्थित

आता प्रशासन या प्रकरणात किती लवकर कारवाई करते आणि संबंधित नागरिकांवर प्रत्यक्षात कायदेशीर कारवाई होते की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थेच्या काटेकोरपणा आणि या काळात प्रशासकीय देखरेखीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहेत. या ड्रोन व्हिडिओच्या आधारे, परीक्षा केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज महसूल अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी रात्री तपासले. जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकरणात शिक्षक, केंद्रप्रमुख आणि इतर संबंधित लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

हे ही वाचा: साताऱ्यात भाजपला 'चेकमेट'; जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येण्याचे संकेत!

हे वाचलं का?

    follow whatsapp