Govt Job: 'DRDO' मध्ये सहभागी व्हा! 'डिप्लोमा-डिग्री'धारक उमेदवारांसाठी नवी भरती...
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) शी संलग्न असलेल्या ISSA संस्थेने एक वर्षाच्या अप्रेंटिसशिपसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
DRDO मध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी
'डिप्लोमा-डिग्री'धारक उमेदवारांसाठी नवी भरती...
Govt Job: सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) शी संलग्न असलेल्या ISSA संस्थेने एक वर्षाच्या अप्रेंटिसशिपसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकारी संस्थेत अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी या भरती मोहिमेंतर्गत एक चांगली संधी आहे. या भरतीसाठी पदवीधर आणि डिग्रीधारक उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरतील.
या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ईमेलद्वारे आहे. यासाठी, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचा अर्ज स्कॅन करून ईमेलद्वारे पाठवावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2026 असून या तारखेनंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
'या' पदांसाठी भरती
ISSA कडून जाहीर झालेल्या नोटिफिकेशननुसार, या भरतीअंतर्गत एकूण 21 रिक्त पदे भरली जातील. या भरतीमध्ये पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निकल अप्रेंटिस या पदांचा समावेश असून या पदासाठी कंप्यूटर सायन्स आणि गणिताची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल.
1. ग्रॅज्युएट अप्रेन्टिस (कंप्यूटर विज्ञान एवं इंजीनियरिंग) - 15 पदे










