नागपूर: 15 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार! प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी... अल्पवयीन आरोपी अटकेत
नागपुरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत एका 15 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी हा पीडितेचा मित्र असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नागपुरात 15 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार!
प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी...
Nagpur Crime: नागपुरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत एका 15 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी हा पीडितेचा मित्र असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती आहे. आरोपी तरुणांनी तिचे प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचं वृत्त आहे.
प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी आणि पीडिता हे एकमेकांचे मित्र होते. घटनेच्या दिवशी, आरोपी तरुणाने पीडितेला त्याच्या घरी बोलावले. त्यावेळी तिथे त्याचे दोन मित्र देखील उपस्थित होते. त्या तिघांनी पीडित तरुणीला तिचे प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर, पीडिता खूप घाबरली आणि तिने भितीमुळे कोणालाही तिच्यासोबत घडलेल्या घृणास्पद कृत्याबद्दल सांगितलं नाही.
हे ही वाचा: मुंबई: दिवसाढवळ्या 19 वर्षीय तरुणीवर गोळ्या झाडून खून... प्रेमत्रिकोणातून भयंकर हत्याकांड! शिवाजीनगरमध्ये खळबळ
तरुणीवर सामूहिक बलात्कार
मात्र, घटनेनंतर पीडितेची प्रकृती अचानक बिघडली आणि तिच्या कुटुंबियांनी याबाबत तिची विचारपूस केली. त्यावेळी, पीडितेने तिच्या घरातील सदस्यांना तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं. त्यानंतर, तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलीस स्टेशनमध्ये पीडितेने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आणि तिच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीडित तरुणी सुद्धा अल्पवयीन असल्यामुळे पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










