छत्रपती संभाजीनगर महापालिका : 2015 मध्ये एमआयएम ठरला होता दुसरा मोठा पक्ष, कोणी किती जागा जिंकल्या होत्या?
Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika Election 2026 : दीर्घकाळ प्रशासक राजवटीखाली असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधी येणार असल्याने आगामी निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. बदललेली राजकीय समीकरणं, आरक्षण, प्रभागरचना आणि विकासाचे मुद्दे यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
छत्रपती संभाजीनगर महापालिका : 2015 मध्ये एमआयएम ठरला होता दुसरा मोठा पक्ष
कोणी किती जागा जिंकल्या होत्या?
सध्याची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाणून घेऊयात..
Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika Election 2026, छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राच्या इतिहासात, संस्कृतीत आणि वारशात महत्त्वाचं स्थान असलेलं छत्रपती संभाजीनगर शहर पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलं आहे. शहराच्या प्रशासन आणि विकासाची जबाबदारी सांभाळणारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (CSMC) ही केवळ प्रशासकीय संस्था नसून, शहराच्या सर्वांगीण विकासाचा कणा मानली जाते. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ शहराला देण्यात आलेल्या या नावामुळे ऐतिहासिक अस्मितेला अधिक बळ मिळालं आहे. पूर्वी औरंगाबाद महानगरपालिका म्हणून ओळखली जाणारी ही संस्था 1936 मध्ये नगरपरिषद म्हणून स्थापन झाली होती. त्यानंतर 1982 मध्ये तिला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला.
आगामी निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष
दीर्घकाळ प्रशासक राजवटीखाली असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधी येणार असल्याने आगामी निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. बदललेली राजकीय समीकरणं, आरक्षण, प्रभागरचना आणि विकासाचे मुद्दे यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. शहराचा कारभार पुढील काळात कोणाच्या हाती जाणार, याकडे संभाजीनगरकरांचं लक्ष लागून राहिलं आहे.
प्रभागरचना : 29 प्रभाग, लोकसंख्येचं असमतोल चित्र
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रभागरचनेनुसार शहरात एकूण 29 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी 28 प्रभागांची लोकसंख्या 40 ते 46 हजारांच्या दरम्यान आहे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असून, प्रभाग क्रमांक 29 मध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 29 हजार लोकसंख्या आहे. महापालिकेच्या टप्पा क्रमांक तीन इमारतीत ही प्रभागरचना नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापैकी सात प्रभागांमध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या तुलनेने अधिक आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये सर्वाधिक, तर 3, 4, 8, 9, 18 आणि 28 या प्रभागांमध्येही एससी लोकसंख्या लक्षणीय आहे.
आरक्षणाचं गणित










