‘मी तेजस्वीच्या विरोधात नाही, पण...’, उद्धव ठाकरेंचा घोसाळकरांच्या वार्डात मास्टरस्ट्रोक, भाषण तुफान चर्चेत
Uddhav Thackeray speech about Tejasvee Abhishek Ghosalkar : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांच्या वार्डात केलेलं भाषण सध्या चर्चेचा विषय बनलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
‘अभिषेक असता तर...’, उद्धव ठाकरेंचं तेजस्वी घोसाळकरांच्या वार्डातील भाषण तुफान चर्चेत,
तेजस्वी घोसाळकरांच्या वार्डात उद्धव ठाकरेंचा चार वाक्यात मास्टरस्ट्रोक
Uddhav Thackeray speech about Tejasvee Abhishek Ghosalkar, मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांच्या वार्डात केलेलं भाषण सध्या चर्चेचा विषय बनलंय. तेजस्वी घोसाळकर यांनी काही आठवड्यांपूर्वी ठाकरेंची साथ सोडत भाजपकडून उमेदवारी मिळवली होती. दरम्यान, त्यांच्या दहिरसरमधील वार्डात निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचले. त्यामुळे ते यावेळी काय बोलणार? याबाबत सर्वांना उत्सुकता होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयत भूमिका घेत सर्वांनी मने जिंकणारी भूमिका मांडलीये. ते नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात..
उद्धव ठाकरे म्हणाले, मी इथे मुद्दामहून आलोय. या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आलो. तुम्हा सर्वांना भेटायला आलो. पण मी इथे कोणाचा पराभव करायला आलोय? हे नीट ऐका.. मला विनोद घोसाळकरांचा अभिमान आहे. कारण विनोद घोसाळकर हे शिवसेना प्रमुखांचे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांचं घर ज्यांनी फोडलं, त्या वृत्तीचा पराभव करण्यासाठी मी आलोय. या घरफोड्या वृत्तीने आज घराघरात भांडणे लावली आहेत. आज त्यांनी विनोदच्या घरात फुट पाडलीये. ही भाजपची फुटपाडी वृत्ती आहे, त्या वृत्तीचा मी पराभव करण्यासाठी आलोय. विनोद तुम्हाला माहिती आहे, माझं कोणाशी व्यक्तिगत भांडणं नाही. उलट मी त्यांना Go ahead दिला होता. या निवडणुकीत मी त्यांना जो वॉर्ड दिला होता, त्यांच्या प्रचारासाठी देखील आलो होतो. मात्र, आपआपसात भांडण लावण्याची भाजपची कुटनिती आहे. मात्र, मला आज अभिषेकची सुद्धा आठवण येत आहे. कारण अभिषेक असता तर आज भाजपची हिंमत झाली नसती. हे थोडं आपलं भावनिक नातं आहे. दु:ख याचं होतं, ती घटना (अभिषेक घोसाळकरांची हत्या) घडली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते. त्यावेळी आपण त्यांचा राजीनामा दिली होती. त्यावेळी फडणवीसांनी हिणकस प्रतक्रिया दिली होती. त्या प्रतिक्रियेचा उच्चार सुद्धा मी आता करु शकत नाही. अशा वृत्तीला आपण भावनेमध्ये अडकून मजबूत करायचं का? हे होणार नाही.
'मी तेजस्वीच्या विरोधात नाही, पण तिला ज्यांनी फोडलंय...', उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, इथे धनश्री एका निष्ठेने उभी आहे. घरफोड्या वृत्तीचा पराभव करावा लागेल. भावाला भावाविरुद्ध उभं करायचं. हिंदू-मुस्लिम करायंच. मराठी-अमराठी करायचं ही, यांची वृत्ती आहे. या वृत्तीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लढू शकतो. मराठी माणूस लढू शकतो. मी आणि राजने आज वचननामा जाहीर केला. कोस्टर रोड आपण केला, कॉलेज आणि शाळा आपण सुरु केल्या. हॉस्पिटलची सुधारणा आपण केली. बेस्ट बसेस सुरु केल्या, याचं श्रेय निर्लज्जपणे भाजपले घेत आहेत. दुसऱ्याच्या काम करण्याची चोरी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवसेना प्रमुखांचा पुतळा आपण उभारला. त्याचं होर्डिंग देखील शिंदेंनी छापलंय. सगळी यंत्रणा हातात घेऊन विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला लावत आहेत. ही झुंडशाही आहे. पैशाच्या बळावर कोणालाही विकत घेऊ शकतो. ही मस्ती या वार्डात तुमच्याकडून उतरवून पाहिजे. मी परत एकदा सांगतो, मी तेजस्वीच्या विरोधात नाही, पण तिला ज्यांनी फोडलंय त्या भाजप विरोधात आहे. त्या भाजपचा पराभव करण्यासाठी मी इथे आलोय. तुम्हाला भाजपचा पराभव करावा लागेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या










