'Masti, Atrangii असले App...', चित्रा वाघांनी सभागृहात पुन्हा केली 'ही' मागणी
भाजप आमदार चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा काही अश्लील Apps वर कारवाईची मागणी विधानपरिषदेत बोलताना केली आहे. पाहा त्या नेमकं काय म्हणाल्या.
ADVERTISEMENT

मुंबई: बाजारात येणाऱ्या नवनवीन अश्लील App वर कठोर कारवाई करावी अशी मागणी पुन्हा एकदा भाजप आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. विधानपरिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. याआधी त्यांनी ULLU अॅपवर बंदी आणावी अशी मागणी केली होती. तशीच मागणी आता त्यांनी पुन्हा एकदा Masti, Atrangii आणि तत्सम अॅप आणि ऑनलाइन गेमिंगबाबत केली आहे.
पाहा विधानपरिषदेत चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या..
डिजिटल युगात मोबाइल असेल, इंटरनेट असेल आणि ऑनलाइन गेमिंग हे मुलांच्या जीवनाचा भाग झाले आहेत. लहान मुलांना मोबाइल पाहण्याचं व्यसन लागलं आहे. नकळतपणे आपलं पालकत्व त्या मोबाइलला पालकांनी बहाल केलंय. ही बाब अत्यंत गंभीर आहे. आपली मुलं गेमिंगच्या दुनियेत हरवतात. ते हरवतात तेव्हा त्यांच्यासमोर काय येतं हे पालकांना माहितीए का?
हे ही वाचा>> 'अजितकाका.. तोपर्यंत मी बटण असंच उघडं ठेवणार', रोहित पवार विधानसभेत ढसाढसा रडले अन्..
गेम खेळताना मुलांना meet new people, dating app, लाइव्ह पॉर्न व्हिडिओ दिसतात. टिंडर, बम्बल किंवा इतर व्हिडिओ चॅट प्रकारच्या सेवा आकर्षण आणि कुतूहल या मुलांच्या मनात निर्माण करतात. मुलांना कुठल्या तरी बाह्य लिंकवर नेतात आणि सुरू होतो मुलांच्या भविष्याशी अतिशय जीवघेणा खेळ.
गेम, चॅट.. अनोळखी व्यक्ती संपर्क करते, टीममध्ये सामील करून घेतात विश्वास जिंकतात.. डिसकॉर्ड आणि टेलिग्राम यासारख्या प्लॅटफॉर्मवर नेऊन या मुलांची वैयक्तिक माहिती विचारली जाते. ही अत्यंत धोकादायक अशी प्रक्रिया आहे.










