बीड : जय महाराष्ट्र.., शेवटचा क्षण; व्हाट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत शिंदेंच्या उपतालुका प्रमुखाचं टोकांचं पाऊल, प्रकृती चिंताजनक

मुंबई तक

Beed Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेसेनेचे उपतालुकाप्रमुख भारत तुळशीराम देवकते यांनी झाडाला साडीने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने साडी फाटल्याने ते खाली पडले. या घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ADVERTISEMENT

Beed Crime News
Beed Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीड : जय महाराष्ट्र.., शेवटचा क्षण;

point

व्हाट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत शिंदेंच्या उपतालुका प्रमुखाचं टोकांचं पाऊल, प्रकृती चिंताजनक

Beed Crime News , बीड : जिल्ह्यामध्ये राजकीय वर्तुळातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिंदेसेनेचे उपतालुकाप्रमुख भारत तुळशीराम देवकते यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर 'शेवटचा जय महाराष्ट्र' लिहित टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. ढेकणमोहा परिसरात ही घटना घडली असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : आधी भाजप आमदार, आता राष्ट्रवादी मंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल; भिगवण कथित अपहरण प्रकरणाला राजकीय वळण

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेसेनेचे उपतालुकाप्रमुख भारत तुळशीराम देवकते यांनी झाडाला साडीने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने साडी फाटल्याने ते खाली पडले. या घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : पुणे रेल्वे स्थानकावर चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमानं विकृतीची परिसीमा ओलांडली

हे वाचलं का?

    follow whatsapp