मोठी बातमी: माणिकराव कोकाटेंनी सांगितलेलं तेच अखेर घडलं, NCP ला मिळाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष!

मुंबई तक

Sunetra Pawar National President of NCP: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आता नवी निवड झाली आहे. पाहा कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल पटेलांची नियुक्ती झाली आहे अशा स्वरुपाचं विधान भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी एका मुलाखतीत केलं होतं. ज्यानंतर राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांनी काही वेळातच मीडियासमोर येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची थेट घोषणाच करून टाकली होती. अखेर आज (26 फेब्रुवारी) राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा कोण सांभाळणार हा कळीचा मुद्दा पुढे आला होता. सुरुवातीला याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. पण सुरुवातीला सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देत पक्षाने त्या पातळीवरचा प्रश्न निकाली काढला होता. पण पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याबाबत बरीच चर्चा सुरू होती. अखेर आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचीच अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली. ती स्वत: प्रफुल पटेल यांनीच केली आहे.

सुनेत्रा पवारांची NCP राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, पाहा प्रफुल पटेल काय म्हणाले

सुनेत्रा पवार यांची NCP राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करताना प्रफुल पटेल म्हणाले की, 'मला असं वाटतं की, आपल्याला आता पुढचा मार्गही तयार करायचा आहे. एक राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी होती की, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंची जबाबदारी होती की, अजितदादांच्या पश्चात पक्षाला कोणत्या दिशेने घेऊन जायचं, कोणाच्या हाती जबाबदारी सोपावणं? यामुळेच मी म्हणतोय की, वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात होते.'

हे ही वाचा>> "सूनेत्राताईंना राष्ट्रवादीच्या अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांच्या सह्या, उर्वरित आमदार कोण आहेत?"

'मात्र, आमच्या कोणाचाही मनात कोणताही वेगळा विचार आला नाही. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की, आम्ही अजितदादा पवारांच्या जागी आता आम्हाला राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करायची आहे. यासाठी आजचं हे राष्ट्रीय अधिवेशन बोलवण्यात आलं आहे.'

हे वाचलं का?

    follow whatsapp