देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर भाजपची बैठक, राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी? विनोद तावडे अन् आठवलेंबाबत मोठा निर्णय?

मुंबई तक

BJP meeting at Devendra Fadnavis bungalow : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या बैठकीला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, मंत्री पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह कोअर कमिटीचे प्रमुख नेते सहभागी झाले होते

ADVERTISEMENT

BJP meeting at Devendra Fadnavis bungalow 
BJP meeting at Devendra Fadnavis bungalow 
social share
google news

बातम्या हायलाइट

point

फडणवीसांच्या बंगल्यावर भाजपची बैठक

point

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी तीन नावं चर्चेत

point

रामदास आठवलेंबाबत मोठा निर्णय?

BJP meeting at Devendra Fadnavis bungalow : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर, मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या कोट्यातील जागांसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्याबाबतही मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजप कोअर कमिटीची खलबतं

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या बैठकीला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, मंत्री पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह कोअर कमिटीचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या 7 जागांपैकी भाजपच्या वाट्याला त्यांच्या संख्याबळानुसार 4 जागा येण्याची शक्यता आहे. या चार जागांसाठी कोणाला संधी द्यायची, यावर बैठकीत दीर्घकाळ खल झाला.

हेही वाचा : सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याहींवर भाजपने टाकली मोठी जबाबदारी, कोणतं पद दिलं?

रामदास आठवलेंबाबत मोठा निर्णय?

या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उमेदवारीचा ठरलाय. गेल्या अनेक दिवसांपासून आठवले यांना पुन्हा संधी मिळणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या कोट्यातील एका जागेवर रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. मित्रपक्षाला सोबत घेण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून आठवलेंना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे समजते.

हे वाचलं का?

    follow whatsapp