सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याहींवर भाजपने टाकली मोठी जबाबदारी, कोणतं पद दिलं?

मुंबई तक

Arun Lakhani : केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असून सरकारमध्ये नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना नव्याने संधी देण्यात आली. अशातच सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखानी यांनाही भाजपच्या नव्या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले. अरुण लखानी यांची पक्षाची सहकोष्टाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

ADVERTISEMENT

Arun Lakhani
Arun Lakhani
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा

point

सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखांनींना 'ही' संधी 

Arun Lakhani : भाजपच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. अशातच सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखानी यांनाही भाजपच्या नव्या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले. अरुण लखानी यांची पक्षाच्या सहकोष्टाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आहे. 

हे ही वाचा : पुणे : बिल्डरच्या फसवणुकीमुळे सेवानिवृत्त अधिकारी नैराश्यात, सातव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केल्याचे वृत्त आहे. या प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या लोकांना संधी देण्यात आली. यामध्ये आमदार गोपीचंद, कृष्णराज महाडिक यांच्यावर नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे. केशव उपाध्ये यांनाही कार्यकारिणीची बढती देण्यात आली आहे. तसेच भाजपचे मुख्य प्रवक्तेपदी नवनाथ बन यांना जबाबदारी दिली आहे.

हे ही वाचा : काकीवर काळ्या जादूचा संशय, पुतण्याने थेट गोळ्या घालून संपवलं! माजी ASI च्या पत्नीसोबत नेमकं काय घडलं?

सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखांनींना 'ही' संधी 

दरम्यान, अरुण लखानी हे सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही असून, लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांचा विवाह निश्चित झाल्याची नुकतीच घोषणा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्तीने रेवती सुळे आणि सारंग लखानी यांची सोयरीक जुळल्याच्या चर्चा आहेत. नुकत्याच झालेल्या भाजपच्या या कार्यकारिणीत अरुण लखानी यांना पक्षाच्या सहकोष्टाध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास दिली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp