पुणे : बिल्डरच्या फसवणुकीमुळे सेवानिवृत्त अधिकारी नैराश्यात, सातव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

मुंबई तक

Pune Crime : पुणे शहरातील बाणेर परिसरात बिल्डरकडून फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी बिल्डर जयंतीलाल ओसवाल आणि ऋषभ ओसवाल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT

Pune Crime
Pune Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मृत नरेश उमाकांत यांनी मालकीची जमीन बिल्डरला दिली 

point

मानसिक आणि नैराश्यात येऊन उमाकांत महाजन यांनी जीवन संपवलं

point

सुसाईड नोटमध्ये काय?

Pune Crime : आदित्य भवार - पुणे शहरातील बाणेर परिसरात बिल्डरकडून फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी बिल्डर जयंतीलाल ओसवाल आणि ऋषभ ओसवाल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : पुणे : पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली, पण तरुणीने पळ काढताना इमारतीच्या खिडकीतून उडी मारली अन् जीव गेला

मृत नरेश उमाकांत यांनी मालकीची जमीन बिल्डरला दिली 

आत्महत्या केलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने नाव नरेश उमाकांत असे आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी बाणेर परिसरातील त्यांची मालकीची जमीन बिल्डर जयंतीलाल ओसवार यांना रिडेव्हलपसाठी दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाजन आणि बिल्डर यांच्यात झालेल्या करारानुसार बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महाजन यांना ठराविक सदनिका देणे बंधनकारक होते. मात्र, दिर्घकाळ उलटून गेल्यानंतरही बिल्डरकडून सदनिका देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली होती. 

मानसिक आणि नैराश्यात येऊन उमाकांत महाजन यांनी जीवन संपवलं

या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई किंवा प्रतिसाद मिळत नसल्याने महाजन मानसिक आणि नैराश्यात होते. यानंतर बिल्डरला दिलेल्या अर्धवट बांधकामाच्या इमारतीवरतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. बिल्डरच्या मानसिक त्रासामुळे उमाकांत महाजन यांनी आत्महत्या केली. 

हे ही वाचा : धक्कादायक, ट्युशन टिचरकडून 13 वर्षीय मुलीवर 20 दिवस अत्याचार, प्रेग्नंट राहिल्याने समोर आला प्रकार

सुसाईड नोटमध्ये काय?

घटनास्थळी सुसाईड नोटमध्ये बिल्डरकडून झालेल्या फसवणुकीमुळे आणि मानसिक त्रासामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले. या प्रकरणी कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला, तसेच बिल्डरवर कठोर कारवाई करण्याची आणि तात्काळपणे अटक करण्याची मागणी केली. बाणेर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp