धक्कादायक, ट्युशन टिचरकडून 13 वर्षीय मुलीवर 20 दिवस अत्याचार, प्रेग्नंट राहिल्याने समोर आला प्रकार
Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपीकडे खासगी शिकवणीसाठी जात होती. तिथेच आरोपीने तिच्या असहायतेचा फायदा घेत तिला आपल्या जाळ्यात ओढले. प्राथमिक माहिती अहवालात (FIR) नमूद केल्यानुसार, आरोपीने गेल्या 20 दिवसांच्या कालावधीत मुलीवर अनेकदा अत्याचार केला. या छळाबाबत कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी त्याने मुलीला दिली होती, ज्यामुळे ती प्रचंड दहशतीखाली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धक्कादायक, ट्युशन टिचरकडून 13 वर्षीय मुलीवर 20 दिवस अत्याचार,
प्रेग्नंट राहिल्याने समोर आला प्रकार
Crime News , लखनौ : गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये उघडकीस आली आहे. आपल्याकडे ट्युशनसाठी येणाऱ्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधम शिक्षकाने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपीकडे खासगी शिकवणीसाठी जात होती. तिथेच आरोपीने तिच्या असहायतेचा फायदा घेत तिला आपल्या जाळ्यात ओढले. प्राथमिक माहिती अहवालात (FIR) नमूद केल्यानुसार, आरोपीने गेल्या 20 दिवसांच्या कालावधीत मुलीवर अनेकदा अत्याचार केला. या छळाबाबत कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी त्याने मुलीला दिली होती, ज्यामुळे ती प्रचंड दहशतीखाली होती.
अत्याचारानंतर गर्भपात आणि उलगडा
या अत्याचारातून पीडित मुलगी गरोदर राहिली. ही बाब समजताच आरोपीने आपले पाप लपवण्यासाठी तिला जबरदस्तीने गर्भपाताचे औषध दिले किंवा तशी प्रक्रिया करण्यास भाग पाडले. गर्भपातानंतर मुलीला असह्य वेदना होऊ लागल्या. प्रकृती खालावल्यामुळे आणि वेदना सहन न झाल्यामुळे अखेर पीडित मुलीने आपल्या आईकडे घडलेला सर्व प्रकार कथन केला. मुलीची आपबिती ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.










