नवनाथ बन यांच्यावर मोठी जबाबदारी, कृष्णराज महाडिक अन् राम सातपुतेंचं 'वजन' वाढलं, भाजपकडून नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक
BJP Maharashtra Padadhikari list : “भाजपमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी महत्त्वाचा आहे. अनेकांनी दीर्घकाळ संघटन वाढीसाठी परिश्रम घेतले आहेत. मात्र प्रदेश पातळीवरील पदांची मर्यादा लक्षात घेता सर्वांना एकाचवेळी जबाबदारी देणे शक्य होत नाही. ज्यांची निवड झाली आहे त्यांचे अभिनंदन; तर ज्यांना यावेळी संधी मिळाली नाही, त्यांनाही इतर माध्यमांतून जबाबदाऱ्या दिल्या जातील,” असे रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले. प्रमुख मोर्चा आणि आघाड्यांतील काही पदांची घोषणाही करण्यात आली असून उर्वरित नियुक्त्या टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजपकडून पदाधिकाऱ्यांची घोषणा, नवनाथ बन यांच्यावर मोठी जबाबदारी
कृष्णराज महाडिक अन् चित्रा वाघ यांना कोणतं पद मिळालं?
BJP Maharashtra Padadhikari list : भारतीय जनता पक्षाने राज्यातील संघटनात्मक फेरबदलाला सुरुवात करत मंगळवारी नव्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नव्या कार्यकारिणीची यादी जाहीर केली. मुख्य प्रवक्ता, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष तसेच विविध मोर्चांच्या अध्यक्षपदांच्या नियुक्त्या यामध्ये करण्यात आल्या आहेत.
रवींद्र चव्हाण काय म्हणाले?
रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या पार्श्वभूमीवर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया निवडणुकांनंतरच पूर्ण करण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला होता. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन, केंद्रीय नेते अमित शाह, बी. एल. संतोष, शिव प्रकाश तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील अन्य महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करूनच या नियुक्त्या निश्चित करण्यात आल्या. सर्व घटकांचा विचार करून संतुलित पद्धतीने ही रचना तयार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“भाजपमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी महत्त्वाचा आहे. अनेकांनी दीर्घकाळ संघटन वाढीसाठी परिश्रम घेतले आहेत. मात्र प्रदेश पातळीवरील पदांची मर्यादा लक्षात घेता सर्वांना एकाचवेळी जबाबदारी देणे शक्य होत नाही. ज्यांची निवड झाली आहे त्यांचे अभिनंदन; तर ज्यांना यावेळी संधी मिळाली नाही, त्यांनाही इतर माध्यमांतून जबाबदाऱ्या दिल्या जातील,” असे रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले. प्रमुख मोर्चा आणि आघाड्यांतील काही पदांची घोषणाही करण्यात आली असून उर्वरित नियुक्त्या टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
जाहीर करण्यात आलेली नावे
मुख्य प्रवक्ता
