पुणे : पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली, पण तरुणीने पळ काढताना इमारतीच्या खिडकीतून उडी मारली अन् जीव गेला

मुंबई तक

Pune Crime News : विमाननगरमधील 'सिटी स्पेस' या इमारतीत एक स्पा सेंटर चालवले जात होते. या ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती विमाननगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास या स्पा सेंटरवर छापा टाकला. पोलीस पथक स्पा सेंटरच्या दरवाजापाशी पोहोचले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा ठोठावून तो उघडण्यास सांगितले. मात्र, आत असलेले कर्मचारी आणि तरुणी घाबरले. पोलिसांच्या कारवाईतून वाचण्यासाठी स्पा सेंटरमधील तरुणी आणि व्यवस्थापकाने इमारतीच्या खिडकीतून थेट खाली उडी मारली.

ADVERTISEMENT

Pune Crime News
Pune Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली

point

पण तरुणीने पळ काढताना इमारतीच्या खिडकीतून उडी मारली अन् जीव गेला

Pune Crime News , पुणे : शहरात सुरू असलेल्या अनधिकृत कृत्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असतानाच, विमाननगर परिसरात एक थरारक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली असता, पोलिसांच्या भीतीने खिडकीतून उडी मारणाऱ्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेत स्पा सेंटरचा व्यवस्थापकही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकी घटना काय?

विमाननगरमधील 'सिटी स्पेस' या इमारतीत एक स्पा सेंटर चालवले जात होते. या ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती विमाननगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास या स्पा सेंटरवर छापा टाकला. पोलीस पथक स्पा सेंटरच्या दरवाजापाशी पोहोचले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा ठोठावून तो उघडण्यास सांगितले. मात्र, आत असलेले कर्मचारी आणि तरुणी घाबरले. पोलिसांच्या कारवाईतून वाचण्यासाठी स्पा सेंटरमधील तरुणी आणि व्यवस्थापकाने इमारतीच्या खिडकीतून थेट खाली उडी मारली.

हेही वाचा : 'पवार साहेबांचा हुकमी एक्का अजित पवारच होते...', जयंत पाटलांचं मोठं विधान

तरुणीचा मृत्यू आणि व्यवस्थापक जखमी

खिडकीतून खाली पडल्यामुळे संकिता मुखर्जी नावाच्या तरुणीच्या डोक्याला भीषण मार लागला. तिला तातडीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याचवेळी तिच्यासोबत उडी मारलेला स्पा सेंटरचा व्यवस्थापकही खाली कोसळला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याचे हाड मोडल्याचे समजते. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp