'पवार साहेबांचा हुकमी एक्का अजित पवारच होते...', जयंत पाटलांचं मोठं विधान
अजित पवार यांच्या निधनानंतर मुंबईत आज (23 फेब्रुवारी) शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुंबईत आज (23 फेब्रुवारी) शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात केलेल्या एका विधानाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद हे सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवल्यानंतर अजित पवार हे नाराज असल्याचा अनेक बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच अजित पवारांनी राष्ट्रवादीतील बहुसंख्य आमदारांना सोबत घेत बंड केलं आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष देखील ताब्यात घेतला होता. त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी वर्चस्वाची लढाई सातत्याने पाहायला मिळत होती.
हे ही वाचा>> 'अजितकाका.. तोपर्यंत मी बटण असंच उघडं ठेवणार', रोहित पवार विधानसभेत ढसाढसा रडले अन्..
मात्र असं असताना आजच्या भाषणात जयंत यांनी थेट म्हटलं की, 'पवार साहेबांवर अजितदादांचं प्रचंड प्रेम होतं. मी तर म्हणेन पवार साहेबांचा आजही हुकमी एक्का अजित पवारच होते.'
पाहा जयंत पाटील नेमकं काय म्हणाले...
'अजितदादा व्यक्तिगत संबंध फार सुरेख सांभाळायचे.. अनेक असे प्रसंग आहेत की, ज्या प्रसंगातून.. मी पक्षाचा अध्यक्ष होतो. त्यावेळेस असे अनेक प्रसंग आहेत की, एखाद्या मतदारसंघातील एखादी गोष्ट करायची असेल तरी दादांचा फोन यायचा की, आपल्याला हेच केलं पाहिजे.. स्पष्ट मतभेद झाले तरी ते त्यांचं मत सांगून फोन ठेवायचे. त्यामुळे स्वत:चं मत मांडायला दादा कधी कचरले नाही.'










