काकीवर काळ्या जादूचा संशय, पुतण्याने थेट गोळ्या घालून संपवलं! माजी ASI च्या पत्नीसोबत नेमकं काय घडलं?

मुंबई तक

पोलिसांनी माजी ASI च्या पत्नीच्या हत्येप्रकरणी महिलेच्या पुतण्याला अटक केल्याचं वृत्त आहे. आपल्या वडिलांचा मृत्यू त्याच्या काकीने केलेल्या काळ्या जादूमुळे झाला तसेच तिच्या काळ्या जादूमुळे दुकानाच्या व्यवसायात देखील तोटा होत असल्याचा आरोपीला संशय होता.

ADVERTISEMENT

पुतण्याने थेट गोळ्या घालून काकीला संपवलं!
पुतण्याने थेट गोळ्या घालून काकीला संपवलं!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काकीवर काळ्या जादूचा संशय, पुतण्याने थेट गोळ्या घालून संपवलं!

point

माजी ASI च्या पत्नीसोबत नेमकं काय घडलं?

Crime News: निवृत्त पंजाब पोलीस एएसआय शाम लाल यांच्या 60 वर्षीय पत्नीच्या हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. आता, पोलिसांनी या प्रकरणामागचं सत्य उघडकीस आणलं असून या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पुतण्या राकेश कुमार याला अटक केल्याचं वृत्त आहे. पंजाबच्या महिंदवाणीमध्ये पीडित महिलेची तिच्या पुतण्यानेच हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

पोलिसांनी आरोपींकडून हत्येत वापरलेले पिस्तूल, तीन काडतुसे आणि एका दुचाकीसह महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. खरं तर, आपल्या वडिलांचा मृत्यू त्याच्या काकीने केलेल्या काळ्या जादूमुळे झाला तसेच तिच्या काळ्या जादूमुळे दुकानाच्या व्यवसायात देखील तोटा होत असल्याचा आरोपीला संशय होता. 

पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, 7 फेब्रुवारी रोजी महिंदवाणी गावात महिलेची हत्या करण्यात आली होती आणि 22 फेब्रुवारी रोजी या हत्येप्रकरणातील आरोपी म्हणजेच पीडितेचा पुतण्या राकेश कुमार याला करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आणि तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. 

हे ही वाचा: "घरातच बसून राहता आणि लग्न सुद्धा होत नाही..." सततच्या टोमण्यांना वैतागून मुलींनी जन्मदात्या बापालाच संपवलं!

नेमकं प्रकरण काय? 

वृत्तानुसार, 7 फेब्रुवारी रोजी, निवृत्त एएसआय शाम लाल यांच्या पत्नी 60 वर्षीय रचना देवी सकाळी 5:30 वाजता गावातील एका धार्मिक स्थळावरून परतत असताना एका बाईकस्वाराने त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली. याप्रकरणी, गडशंकर पोलिस ठाण्यात तपास सुरू करण्यात आला आणि पोलिसांच्या विविध पथकांनी हत्येचं गूढ उकललं. चौकशीदरम्यान आरोपी राकेश कुमारने पोलिसांना सांगितलं की, तो हिमाचल प्रदेशातील गोंदपूर गावात रेडीमेड कपड्यांचे दुकान चालवतो. त्याच्या वडिलांचे काही काळापूर्वी निधन झाले होते. त्याला संशय होता की त्याची काकी रचना हिने त्याच्या घरावर काळी जादू केली होती, ज्यामुळे त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्याचे दुकान बंद पडले. परिणामी, त्याने त्याच्या काकीवर तीन गोळ्या झाडून तिची हत्या केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp