नवरा ऑस्ट्रेलियाला गेलाय, बायको 2 वर्ष सांगत राहिली, शेवटी दृश्यम स्टाईल ट्वीस्ट
Gujarat jamnagar drishyam style murder : गुजरातमधील जामनगरमध्ये 'दृश्यम' चित्रपटाची आठवण करून देणाऱ्या खून प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला. पत्नीने पती ऑस्ट्रेलियाला गेल्याचे सांगत तब्बल दोन वर्षे नातेवाईकांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवरा ऑस्ट्रेलियाला गेलाय, बायको 2 वर्ष सांगत राहिली
शेवटी दृश्यम स्टाईल ट्वीस्ट
Gujarat jamnagar drishyam style murder : गुजरातमधील जामनगर येथे 'दृश्यम' चित्रपटाची आठवण करून देणाऱ्या एका खळबळजनक बेपत्ता प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. पत्नी, तिचा कथित प्रियकर आणि त्याच्या एका मित्राने मिळून पतीची हत्या करून त्याचा मृतदेह तब्बल 12 फूट खोल खड्ड्यात पुरून त्यावर काँक्रीटचा जाड थर टाकल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : 'अमेरिका से भारत आया था चुपके-चुपके, उनका नाम है अभिजीत दिपके'; रामदास आठवलेंची भन्नाट कविता ऐकाच
पोलिसांनी काँक्रीट फोडून सांगाडा बाहेर काढला
पोलिसांनी कारखान्याच्या परिसरातील काँक्रीट फोडून सांगाडा बाहेर काढला असून तो जिग्नेश मावडिया याचाच असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृताची ओळख निश्चित करण्यासाठी सांगाडा तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात पृथ्वी उर्फ भूमिबेन, तिचा कथित माजी प्रियकर निलेश कच्छटिया आणि त्याचा मित्र बलवीर वर्मा यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा : Personal Finance: महिन्याला 2 हजार रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांनी कोणती चूक टाळावी?
