मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात डीसीपींसोबत शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
Rohit Pawar Facebook post : सर्व घडामोडींनंतरही पोलिसांनी डीजीसीएविरोधातील तक्रार नोंदवून घेण्यास स्पष्ट नकार दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वर्तुळात नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या वादानंतर आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. रोहित पवार काय म्हणाले? जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात डीसीपींसोबत शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट
नेमकं काय म्हणाले?
Rohit Pawar Facebook post : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी डीजीसीए विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गेले असता तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. तक्रार स्वीकारण्याबाबत पोलिसांनी नकारात्मक भूमिका घेतल्याने आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी रोहित पवार आणि डिसीपींमध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे परिस्थिती काही काळ तणावपूर्ण राहिली.दरम्यान, सर्व घडामोडींनंतरही पोलिसांनी डीजीसीएविरोधातील तक्रार नोंदवून घेण्यास स्पष्ट नकार दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वर्तुळात नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या वादानंतर आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. रोहित पवार काय म्हणाले? जाणून घेऊयात..
रोहित पवारांची पोस्ट जशीच्या तशी
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत योग्य कारवाईची वाट बघत असतानाच काल या अपघातास VSR कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा DGCA चा अहवाल आला. परंतु अद्यापही याबाबत कोणताही FIR दाखल करण्यात आला नसल्याने या अहवालाच्या आधारे आ. अमोल मिटकरी, आ. इद्रिस नाईकवडी आणि आ. संदिप क्षीरसागर यांच्यासह मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जाऊन BNS कायद्यानुसार FIR दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार माझा जबाब घेण्यास सुरवातही झाली होती, परंतु त्याचवेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा FIR दाखल करुन घेण्यास नकार देत केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अर्ज घेतला.
पोलिसांच्या या कृतीमुळं विमान अपघाताबाबत आम्ही व्यक्त करत असलेला संशय अधिक गडद होत आहे. विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून मागणी करुनही पोलिसांकडून FIR दाखल करण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. यामुळं सरकार आणि यंत्रणा कुणालातरी वाचवत असल्याचं स्पष्ट दिसत असून हे असंच सुरु राहिलं तर अजितदादांना न्याय मिळेल का? अशी शंका निर्माण होत आहे, परंतु आम्ही मात्र हा विषय तडीस नेल्यावाचून थांबणार नाही. उद्या सकाळी ९ वाजता FIR दाखल करण्यासाठी अजितदादांवर प्रेम करणारे आम्ही सर्वजण बारामती तालुका पोलीस ठाण्यात जाणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या










