Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय SBI मध्ये थेट मोठ्या पदाची नोकरी! तगडा पगार अन्.. कधीपर्यंत कराल अर्ज?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात बँकेच्या sbi.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जारी झाली असून 24 फेब्रुवारीपासून भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोणत्याही परीक्षेशिवाय SBI मध्ये थेट मोठ्या पदाची नोकरी!
तगडा पगार अन्.. कधीपर्यंत कराल अर्ज?
Govt Job: सरकारी बँकेत कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय मोठ्या पदावरील नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात बँकेच्या sbi.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जारी झाली असून 24 फेब्रुवारीपासून भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवार 16 मार्च 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
एसबीय (SBI) च्या या भरतीअंतर्गत आयटी सिक्योरिटी एक्स्पर्ट, इमर्जिंग टेक्नॉलॉजी, सायबर सिक्योरिटी एनालिस्ट, इंसिडेंट मॅनेजमेंट अँड फॉरेन्सिक आणि टेस्ट इंजीनिअर्स कॅडरमध्ये डेप्युटी मॅनेजर पदासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. ही पदे MMGS-II रेग्युलर असून उमेदवारांसाठी SBI मध्ये नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
काय आहे पात्रता?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे B.Tech in computer science/ बी.ई (B.E)/ कंप्यूटर सायन्स अँड इंजीनिअरिंग/ सॉफ्टवेअर इंजीनिअरिंग/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनिअरिंग किंवा संबंधित डिग्री किमान 50 टक्के गुणांसह असायला हवी. याशिवाय, एमसीए किंवा एमटेक/ कंप्यूटर सायन्समध्ये एमएससी/ कंप्यूटर सायन्स अँड इंजीनियरिंग/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ सॉफ्टवेयर इंजीनियरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स इंजीनियरिंग किंवा समकक्ष डिग्री असलेले उमेदवारा सुद्धा अर्ज करू शकतात. यासोबतच, उमेदवारांना सायबर सिक्योटिरी/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा संबंधित क्षेत्रात चार वर्षांचा अनुभव असायला हवा.
हे ही वाचा: महाराष्ट्र हादरला! भावाने सख्ख्या बहिणीचा तलवारीने गळा चिरला; जन्मदात्या आईला सुद्धा सोडलं नाही...
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं किमान वय 25 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे असणं आवश्यक आहे. 31 डिसेंबर 2026 तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.










