नागपूर: पोलीस कर्मचाऱ्याची अंबाझरी तलावात उडी मारून आत्महत्या! मुलांच्या कस्टडीवरून पत्नीसोबत वाद झाल्याने टोकाचं पाऊल...
नागपूर शहराच्या प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलने काल (24 फेब्रुवारी) रात्री अंबाझरी तलावात उडी मारून आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीसोबतच्या कौटुंबिक वादाला कंटाळून पीडित कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याची अंबाझरी तलावात उडी मारून आत्महत्या!
मुलांच्या कस्टडीवरून पत्नीसोबत वाद झाल्याने टोकाचं पाऊल...
Nagpur Crime: नागपुरात कौटुंबिक वादाला कंटाळून एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहराच्या प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलने काल (24 फेब्रुवारी) रात्री अंबाझरी तलावात उडी मारून आपलं आयुष्य संपवलं.
शिलरत्न बेलेकर (45 वर्षे) अशी मृत पोलीस कर्मचाऱ्याची ओळख समोर आली असून ते वाघदरी-इसासनी परिसरातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास काही तरुण अंबाझरी तलावात पोहोण्यासाठी आले होते आणि त्यावेळी त्यांनी पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनंतर, त्या तरुणांनी तातडीने अंबाझरी पोलिसांना याची माहिती दिली.
हे ही वाचा: सोलापूर: जावयानेच केला सासऱ्याचा खून! ऊसाच्या शेतात गाठून निर्घृण हत्या; नंतर स्वत:वर सुद्धा चाकूने वार...
संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह तलावातून बाहेर काढला. पोलिसांनी तपास सुरू असता त्यांना मृतदेहाजवळ ओळखपत्र सापडलं आणि त्या आधारे त्यांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर, पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत शिलरत्न बेलेकर यांची काही महिन्यांपूर्वी हिंगणा पोलीस ठाण्यातून प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली होती.
हे ही वाचा: प्रियकरासमोर तरुणीवर 7 जणांकडून आळीपाळीने सामूहिक बलात्कार! बळजबरीने पैशांची मागणी अन्...
पत्नीसोबतच्या वादामुळे मानसिक तणाव...
वृत्तानुसार, मागील दोन वर्षांपासून शिलरत्न यांचे त्यांच्या पत्नीसोबत सतत वाद सुरू होते. याच कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी आपल्या माहेरी राहत होती आणि शिलरत्न त्यांच्या दोन मुलांसह इसासनी येथील त्यांच्या घरी राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पत्नीने आपल्या मुलांचा ताबा मागितल्यामुळे ते मानसिक तणावात होते. 19 फेब्रुवारीपासून शिलरत्न त्यांच्या ड्युटीवरून गैरहजर होते आणि त्यानंतर ते घरी न परतल्याने त्यांच्या भावाने 22 फेब्रुवारी रोजी प्रतापनगर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. आज सकाळी त्यांचा मृतदेह अंबाझरी तलावात तरंगताना आढळला.










