सोलापूर: जावयानेच केला सासऱ्याचा खून! ऊसाच्या शेतात गाठून निर्घृण हत्या; नंतर स्वत:वर सुद्धा चाकूने वार...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथे अतिशय धक्कादायक आणि थरारक घटना घडल्याचं समोर आलं आहे. घरगुती वादातून संतापलेल्या जावयाने ऊसाच्या शेतात आपल्या सासऱ्यावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जावयानेच केला सासऱ्याचा खून!
ऊसाच्या शेतात गाठून निर्घृण हत्या; नंतर स्वत:वर सुद्धा चाकूने वार...
सोलापुरातील धक्कादायक घटना
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथे मंगळवारी अतिशय धक्कादायक आणि थरारक घटना घडल्याचं समोर आलं आहे. घरगुती वादातून संतापलेल्या जावयाने ऊसाच्या शेतात आपल्या सासऱ्यावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याचं वृत्त आहे. या घटनेनंतर, आरोपी जावयाने स्वतःवरही चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. या भयानक घटनेने आता परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ऊसाच्या शेतात सासऱ्याची निर्घृण हत्या
55 वर्षीय सिंकदर मुलका शेख अशी मृत व्यक्ती ओळखअसून ते इंगळगी येथील रहिवासी होते. तसेच, जावई सादिक दफेदार (वय 35, रा. पानमंगरुळ, ता. अक्कलकोट) अशी आरोपीची ओळख असल्याची माहिती समोर आली आहे. त्या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते. याच वादातून आरोपी सादिकने रागाच्या भरात आपल्या सासऱ्यांना ऊसाच्या शेतात गाठून त्यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला आणि त्यांची निर्घृण हत्या केली.
हे ही वाचा: प्रियकरासमोर तरुणीवर 7 जणांकडून आळीपाळीने सामूहिक बलात्कार! बळजबरीने पैशांची मागणी अन्...
हत्येनंतर, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
सासऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर, आरोपी सादिक दफेदार याने स्वत:वर सुद्धा चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या सिंकदर शेख यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, आरोपी सादिक हा देखील गंभीररित्या जखमी असून सध्या त्याच्यावर सोलापुरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: 10 वीच्या विद्यार्थिनीने शाळेच्या बाथरुममध्ये दिला बाळाला जन्म, गणिताचा पेपर सुरु असतानाच पोटात वेदना, माहिती मिळताच कान्हा फरार
संबंधित घटनेची माहिती मिळताच, वळसंग पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी त्यांच्या फॉरेन्सिक टीमसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच, घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी पुरावे गोळा केले असून याप्रकरणी वळसंग पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत सिकंदर शेख यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आल्याची माहिती आहे. कौटुंबिक वादाचं पर्यावसान इतक्या टोकाच्या हिंसेत झाल्याने इंगळगी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वळसंग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, वादाचं नेमकं कारण काय होतं, याचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे.










