10 वीचा गणिताचा पेपर सुरु असताना प्रसुती वेदना, विद्यार्थीनीने बाथरुममध्ये दिला बाळाला जन्म, माहिती मिळताच कान्हा फरार
Crime News : दहावीची परीक्षा सुरु असताना एका अल्पवयीन विद्यार्थिनीने नवजात बालकाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका खासगी परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर सुरू असताना ही घटना घडली. या घटनेने परिसरात आणि शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून, प्राथमिक तपासात विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विद्यार्थिनीने बाथरुममध्ये दिला बाळाला जन्म
दहावीचा गणिताचा पेपर सुरु असतानाच पोटात वेदना
नेमकं काय घडलं?
Crime News : दहावीची परीक्षा सुरु असताना एका अल्पवयीन विद्यार्थिनीने नवजात बालकाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका खासगी परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर सुरू असताना ही घटना घडली. या घटनेने परिसरात आणि शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून, प्राथमिक तपासात विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील ही घटना आहे.
हे ही वाचा : बायकोच्या माहेरी गेला अन् अल्पवयीन मेहुणीला बघून नियत फिरली; दाजीचं घृणास्पद कृत्य अन्...
गणिताचा पेपर सुरु असतानाच दिला बाळाला जन्म
धार जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर ही विद्यार्थिनी पेपर देण्यासाठी आली होती. परीक्षा सुरू असतानाच तिच्या पोटात अचानक तीव्र कळा सुरू झाल्या. ती तातडीने स्वच्छतागृहात गेली, तिथे तिने एका बाळाला जन्म दिला. परीक्षा केंद्र संचालकांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. विद्यार्थिनी आणि नवजात बालकाला तातडीने पीथमपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
'कान्हा'ने केले अत्याचार
या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी पीडित मुलीची विचारपूस केली. यावेळी तिने धक्कादायक खुलासा केला की, गेल्या दोन वर्षांपासून बेटमा येथील जीवन ज्योती कॉलनीतील 'कान्हा' नावाचा तरुण तिच्या संपर्कात होता. लग्नाचे आमिष दाखवून आणि धाक दाखवून तो तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करत होता. या छळातूनच तिला गर्भधारणा झाली होती. पीडितेच्या जबाबानुसार, पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरू केला आहे.










