बायकोच्या माहेरी गेला अन् अल्पवयीन मेहुणीला बघून नियत फिरली; दाजीचं घृणास्पद कृत्य अन्...
आपल्या सासरी आलेल्या एका तरुणाने त्याच्या अल्पवयीन मेहुणीसोबतच घृणास्पद कृत्य केल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायकोच्या माहेरी गेला अन् अल्पवयीन मेहुणीला बघून नियत फिरली
दाजीचं मेहुणीसोबत घृणास्पद कृत्य अन्...
Crime News: आपल्या सासरी आलेल्या एका तरुणाने त्याच्या अल्पवयीन मेहुणीसोबतच घृणास्पद कृत्य केल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. संबंधित घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील लालगंज पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय.
अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार...
मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मनियारी येथील रहिवासी असलेला विष्णू राम नावाचा तरुण लालगंज येथे आपल्या सासरच्या मंडळींना भेटायला बायकोच्या माहेरी गेला होता. या दरम्यान त्याने शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडिता ही नात्याने आरोपीची मेहुणी लागत असल्याची माहिती आहे. आता, आरोपी तरुणाच्या या कृत्यामुळे गावकरी त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मेट्रो 12A प्रोजेक्टला मंजुरी; कल्याण-शिळफाटा मार्गे नवी मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी, प्रवाशांना फायदा
प्रकरणाची माहिती मिळताच, लालगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचं प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्वरीत कारवाई करत आरोपी विष्णू राम याला ताब्यात घेतलं. तसेच, पीडित अल्पवयीन मुलगी ही अस्वस्थ अवस्थेत आढळल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने तिला वैद्यकीय तपासणीसाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता पोलीस पीडितेचा जबाब नोंदवत असून पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जात असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: माजी सैनिकाच्या हत्येने साताऱ्यात संतापाची लाट, गावगुंड आरोपी अजूनही फरार असल्याने सैनिकांचा आक्रोष मोर्चा
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती
दरम्यान संबंधित प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, या घटनेचा सर्व टेक्निकल आणि फॉरेन्सिक अँगलने पोलीस तपास करत आहेत, जेणेकरून न्यायालयात आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर करता येतील. पुढे ते म्हणाले की, मेडिकल रिपोर्ट आणि एफएसएलकडून गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. आता, पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना निष्पक्ष चौकशी आणि न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.










