मुंबईची खबर: मेट्रो 12A प्रोजेक्टला मंजुरी; कल्याण-शिळफाटा मार्गे नवी मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी, प्रवाशांना फायदा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ते तळोजा मेट्रो 12 मार्गाच्या विस्ताराला मान्यता दिल्याची बातमी समोर आली आहे. यासह, मेट्रो 12A प्रकल्प आता दहिसर मोरी ते कल्याण शिळफाटा मार्गे तळोजा पर्यंत विस्तारित होईल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई मेट्रो 12A प्रोजेक्टला मंजुरी
कल्याण-शिळफाटा मार्गे नवी मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी
Mumbai News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ते तळोजा मेट्रो 12 मार्गाच्या विस्ताराला मान्यता दिल्याची बातमी समोर आली आहे. यासह, मेट्रो 12A प्रकल्प आता दहिसर मोरी ते कल्याण शिळफाटा मार्गे तळोजा पर्यंत विस्तारित होईल. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, 8414.53 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) द्वारे शहरात राबवल्या जाणाऱ्या विकास प्रकल्पांची देखील पाहणी केली.
कल्याण-डोंबिवली परिसरात वाहतूक गतिमान करण्यासाठी बरेच प्रकल्प सुरू आहेत. मेट्रो, रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोड, रेल्वे पूल आणि रस्ते रुंदीकरण अशी प्रोजेक्ट्सवर सध्या काम सुरू असून त्यातील काही कामे पूर्ण झाल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त, एमएमआरडीए (MMRDA) ने या प्रकल्पाच्या पूर्णतेसह प्रोजेक्टसाठी 4897 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि खासदार डॉ. शिंदे यांनी या प्रकल्पाच्या सद्यस्थितीची पाहणी केली.
मेट्रो 12 चा तळोजा पर्यंत विस्तार
त्यांनी पलावा उड्डाणपूल, मेट्रो 12, तिसरा पत्री पूल, विठ्ठलवाडी स्टेशन ते कल्याण न्यू अहिल्यानगर महामार्ग आणि कल्याण रिंग रोडपर्यंत वालधुनी नदीच्या काठावरील एलिव्हेटेड रोडची पाहणी केली. या प्रकल्पाचं काम जलदगतीने करण्याचे आणि प्रोजेक्टसाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेले अतिक्रमण काढून टाकण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी मेट्रो 12 चा तळोजा पर्यंत विस्तार करण्याची घोषणा केली. या मार्गाच्या विस्तारासाठी कल्याण शील मार्गावरील इतर अनेक गावांनाही या मेट्रोचा फायदा होईल. मेट्रो 12 मार्ग दोन विभागांमधून जाणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: Govt Job: रेल्वेत तब्बल 11,000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती... RRB कडून नवीन नोटिफिकेशन जाहीर
प्रवाशांना मोठा फायदा
पहिल्या मार्गासाठी स्थानके निश्चित झाली असून याच्या दुसऱ्या मार्गाचा फायदा डोंबिवली, मानपाडा, कटाई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडले गाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसर मोरी, दहिसरगाव, किरवली गाव, रोहिंजन आणि खुटारी गाव भागातील प्रवाशांना होईल. मेट्रो 12 आणि मेट्रो 12A खुटारी येथे एकमेकांशी जोडल्या जातील. ही मेट्रो लाईन ग्रामीण भागातून जाणारी पहिली असेल. भविष्यात ती मेट्रो 14 शी जोडली गेली तर नवी मुंबई आणि कांजूरमार्गहून थेट मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होईल.










