Govt Job: रेल्वेत तब्बल 11,000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती... RRB कडून नवीन नोटिफिकेशन जाहीर
रेल्वेत सरकारी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी RRB च्या नव्या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्रालयाने 11,000 हून अधिक असिस्टंट लोको पायलट पदांसाठी नवीन भरतीसाठी मंजूरी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रेल्वेत तब्बल 11,000 हून अधिक पदांसाठी भरती...
RRB कडून नवीन नोटिफिकेशन जाहीर
Govt Job: रेल्वेत सरकारी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी RRB च्या नव्या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्रालयाने 11,000 हून अधिक असिस्टंट लोको पायलट पदांसाठी नवीन भरतीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. यानंतर, रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) असिस्टंट लोको पायलटसाठी विभागनिहाय रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
या नवीन एएलपीच्या रिक्त पदांची रेल्वेच्या विभागनिहाय यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी आरआरबीच्या नव्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये उमेदवारांना पाहता येईल. पूर्व किनारी रेल्वे (ईस्ट कोस्ट रेल्वे) मध्ये सर्वाधिक 1625 रिक्त पदे आहेत. तसेच, दक्षिण पूर्व रेल्वे (साउथ ईस्टर्न रेल्वे) मध्ये 1531 रिक्त जागा आहेत, तर मध्य रेल्वे (सेंट्रल रेल्वे) मध्ये 1400 रिक्त जागा आहेत. याआधारे, 2026 मध्ये एकूण 11,127 रिक्त पदांसाठी रेल्वेचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता
रेल्वेच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र किंवा इंजीनिअरिंग (अभियांत्रिकी) डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल) असणं अनिवार्य आहे.
हे ही वाचा: "घरातच बसून राहता आणि लग्न सुद्धा होत नाही..." सततच्या टोमण्यांना वैतागून मुलींनी जन्मदात्या बापालाच संपवलं!
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असणं अनिवार्य आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल. पात्रतेसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात.










