21 वर्षीय लेकाने 49 वर्षीय वडिलांनी केली हत्या, नंतर तुकडे ड्राममध्ये भरले, हादरवून टाकणारी घटना

मुंबई तक

Crime News : 21 वर्षीय तरुणाने आपल्याच वडिलांची हत्या केली. या प्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे वडिलांशी झालेल्या वादातून लेकानेच वडिलांवर गोळीबार करत संपवलं. त्यानंतर त्यांचे तुकडे एकत्र करून फेकून देण्यात आले.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाने वडिलांची हत्या करून मृतदेह ड्राममध्ये भरला

point

आरोपी मुलाकडून गुन्ह्याची कबुली

Crime News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका 21 वर्षीय तरुणाने आपल्याच वडिलांची हत्या केली. या प्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे वडिलांशी झालेल्या वादातून लेकानेच वडिलांवर गोळीबार करत संपवलं. त्यानंतर त्यांचे तुकडे एकत्र करून फेकून देण्यात आले. मृत वडिलांचे नाव मानवेंद्र सिंग (वय 49) असे आहे. 

हे ही वाचा : डोंबिवलीत डॉक्टरचे नर्सशी विवाहबाह्य प्रेमसंबंध, 10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न

तरुणाने वडिलांची हत्या करून मृतदेह ड्राममध्ये भरला

संबंधित तरुण हा ड्रग्स आणि दारूचा व्यवसाय करत होता, तो शुक्रवारपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितलं की, त्यांना त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर सत्य समोर आले. मानवेंद्रचे मृतदेह एका ड्रममध्ये भरण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात आरोपी अक्षत प्रताप सिंगची चौकशी केली. 

गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर अक्षतने त्याच्या वडिलांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाच्या तुकडे केल्याची कबुली दिली. दरम्यान,मानवेंद्रची आपल्या मुलाने मेडिकल क्षेत्रात करिअर करावं अशी इच्छा होती, पण अक्षत प्रतापला हे मान्य नव्हते. यावरून दोघांमध्ये शुक्रवारी दुपारी 4:30 वाजता वाज झाला, या वादातून अक्षतने त्याच्या वडिलांवर गोळीबार केला आणि मृतदेहाचे तुकडे केले. 

हे ही वाचा : नगर-दौंड महामार्गावर भरधाव आलेल्या ट्रकने कारला चिरडलं, भीषण अपघातात तिघांचा जागीच अंत

हे कृत्य करताना त्याच्या बहिणीने पाहिले असता, त्याने तिला गप्प बसण्याची धमकी दिली होती. त्याने तिच्यासमोर मृतदेहाचे तुकडे केले आणि प्लास्टिक पिशवीत भरून निळ्या ड्रममध्ये भरले. त्याच्या कबुलीनंतर, फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी नमुने गोळा केले. या प्रकरणी आरोपी अक्षत प्रतापला पोलिसांनी कोठडीत आणले. या प्रकरणी पुराव्याच्या आधारे गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी विक्रांत वीर यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp