मुंबईची खबर: मुंबईकरांनो! 3,550 घरांसाठी लॉटरी निघणार... म्हाडाची मोठी घोषणा! मोक्याच्या जागी 31 लाखांत हक्काचं घर
म्हाडाकडून तब्बल 3,550 घरांसाठी सोडर जाहीर होणार असून मुंबईतील गोरेगाव, विक्रोळी कन्नमवार नगर आणि प्रतिक्षा नगर या ठिकाणी ही घरे सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईकरांनो! 3,550 घरांसाठी लॉटरी निघणार...
म्हाडाच्या मुंबई बोर्डाची मोठी घोषणा
मोक्याच्या जागी 31 लाखांत हक्काचं घर
Mumbai News: महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) च्या मुंबई बोर्डाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाकडून तब्बल 3,550 घरांसाठी सोडर जाहीर होणार असून मुंबईतील गोरेगाव, विक्रोळी कन्नमवार नगर आणि प्रतिक्षा नगर या ठिकाणी ही घरे सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बोर्डाची ही सोडत मार्च-एप्रिल महिन्यात जारी केली जाणार आहे. सर्वाधिक 2,950 घरे ही गोरेगावच्या पत्रा चाळीमध्ये आहेत, तर सुमारे 600 घरे विक्रोळी कन्नमवार नगर आणि प्रतीक्षा नगरमध्ये उपलब्ध असतील.
घरांचं बांधकाम अंतिम टप्प्यात...
गोरेगावमधील 2,950 घरांपैकी 250 घरे उच्च उत्पन्न गटासाठी, 1700 घरे मध्यम उत्पन्न गटासाठी आणि 1000 घरे कमी उत्पन्न गटासाठी उपलब्ध असणार आहेत. विक्रोळीमधील 600 घरांपैकी बहुतेक घरे मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत. या घरांचं बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
म्हाडाच्या मुंबई बोर्डाची मागील लॉटरी 2024 मध्ये जारी झाली होती. त्यावेळी, 2030 घरांसाठी 1.29 लाख लोकांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलं होतं. तसेच, 2023 मध्ये 4,082 घरांसाठी 1.09 लाख अर्ज प्राप्त झाले होते. खरं तर, कमी उपलब्धतेमुळे अर्जदारांना जास्त वेळ वाट पाहावी लागत असून आता म्हाडाने घरांच्या लॉटरी प्रक्रियेची तयारी वेगवान केल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय SBI मध्ये थेट मोठ्या पदाची नोकरी! तगडा पगार अन्.. कधीपर्यंत कराल अर्ज?
मुंबईतील 'या' परिसरात घरांची लॉटरी
तुंगा, पवई
अँटॉप हिल, वडाळा
जेव्हीपीडी (JVPD), अंधेरी पश्चिम
ताडदेव
लोअर परळ
भायखळा
कांदिवली (शिंपोली/चारकोप)










