शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल, अशक्तपणामुळे सलाईन लावण्यात येणार

मुंबई तक

Sharad Pawar Health Update : यापूर्वीही त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार काही दिवस बारामतीत मुक्कामी होते. या काळात त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या भेटीगाठी घेत कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या दरम्यान त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. त्यामुळे त्यांना बारामतीहून पुण्यात आणण्यात आले होते.

ADVERTISEMENT

Sharad Pawar
Sharad Pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल

point

अशक्तपणामुळे सलाईन लावण्यात येणार

 Sharad Pawar Health Update, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना पुन्हा एकदा पुण्यातील Ruby रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अलीकडे त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्याने तसेच अन्नप्राशन व्यवस्थित होत नसल्याने डॉक्टरांनी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना सलाईन लावण्यात येणार असून आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्या जाणार आहेत.

यापूर्वीही त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार काही दिवस बारामतीत मुक्कामी होते. या काळात त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या भेटीगाठी घेत कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या दरम्यान त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. त्यामुळे त्यांना बारामतीहून पुण्यात आणण्यात आले.

हेही वाचा : 'VSR कंपनीला कोण वाचवतंय...', रोहित पवारांनी 'त्या' केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मागितला, मोदी-शाहांकडेही मोठी मागणी

तेव्हा शरद पवार बारामती येथील त्यांच्या ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी होते. अचानक खोकला आणि ताप आल्याने डॉक्टरांची टीम त्यांच्या घरी दाखल झाली होती. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तेथे सुमारे पाच दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती आणि त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर ते पुण्यातील निवासस्थानी विश्रांती घेत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp