'VSR कंपनीला कोण वाचवतंय...', रोहित पवारांनी 'त्या' केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मागितला, मोदी-शाहांकडेही मोठी मागणी

मुंबई तक

Rohit Pawar : रोहित पवार म्हणाले की, या विमान अपघाताबाबत त्यांनी स्वतःच्या पातळीवर चौकशी केली असून त्यात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त विमान ज्या VSR Ventures Private Limited कंपनीचे होते, त्या कंपनीला मोठ्या आणि व्यक्तींकडून वाचवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

ADVERTISEMENT

Rohit Pawar
Rohit Pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'VSR कंपनीला कोण वाचवतंय...',

point

रोहित पवारांनी 'त्या' केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मागितला

point

मोदी-शाहांकडेही मोठी मागणी

Rohit Pawar : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

रोहित पवार म्हणाले की, या विमान अपघाताबाबत त्यांनी स्वतःच्या पातळीवर चौकशी केली असून त्यात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त विमान ज्या VSR Ventures Private Limited कंपनीचे होते, त्या कंपनीला मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींकडून वाचवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले, VSR कंपनीशी संबंधित काही व्यक्ती सत्ताधारी वर्तुळात आहेत. काही जण राज्य पातळीवर तर काही जण केंद्रात सत्तेला पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी संबंधित आहेत. “जर कोणी VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तोही या कटाचा भाग आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मधील काही अधिकारीही कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.

“या प्रकरणात जर अजित पवार यांना न्याय मिळवून देऊ शकतील, तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहच आहेत.” त्यांनी दोघांनाही या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आवाहन केले असून पंतप्रधानांना ईमेलद्वारे पत्र पाठवणार असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा मुद्दा प्रमुख्याने उपस्थित करावा, अशी मागणी रोहित पवार केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp