जालना : अंगावर सीमा अन् खुशी नावाचे दोन टॅटू, विहिरीत अज्ञात व्यक्तीचा सडलेला मृतदेह आढळला, पाहू देखील वाटेना!
Jalna crime news : हा मृतदेह गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यात असल्याने तो पूर्णपणे फुगलेला आणि सडलेल्या अवस्थेत आहे. मृतदेहाचा चेहरा ओळखण्यापलीकडे गेला असून, पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जालना : अंगावर सीमा अन् खुशी नावाचे दोन टॅटू
विहिरीत अज्ञात व्यक्तीचा सडलेला मृतदेह आढळला, पाहू देखील वाटेना!
Jalna crime news,जालना : जालना जिल्ह्यातील रोहनवाडी शिवारात आज एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असून, त्याची अवस्था इतकी भीषण आहे की तो पाहणेही अशक्य झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, ही हत्या आहे की आत्महत्या, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्याजवळील रोहनवाडी येथील एका शेतातील विहिरीत आज दुपारच्या सुमारास काही ग्रामस्थांना दुर्गंधी जाणवली. विहिरीत डोकावून पाहिले असता, एका पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. ग्रामस्थांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीबाहेर काढला.
मृतदेहाची भीषण अवस्था
हा मृतदेह गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यात असल्याने तो पूर्णपणे फुगलेला आणि सडलेल्या अवस्थेत आहे. मृतदेहाचा चेहरा ओळखण्यापलीकडे गेला असून, पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगण्यात येत आहे.
ओळखीसाठी 'टॅटू'चा मोठा आधार










