"सूनेत्राताईंना राष्ट्रवादीच्या अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांच्या सह्या, उर्वरित आमदार कोण आहेत?"
Rohit Pawar on Sunetra Pawar : "सुनेत्राकाकी राष्ट्रीय अध्यक्षा व्हाव्यात, यासाठी केवळ 35 आमदारांच्या सह्या आहेत. इतरांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा का दिला नाही?" असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केलाय. आधी सुनेत्रा पवारांच्या नावाला पाठिंबा देणारे रोहित पवार आता याबाबत शंका उपस्थित करत आहेत. त्यामुळे रोहित पवारांच्या मनात नेमकं काय आहे? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"...माझा भाऊ पळवला"
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शिंदेसेनेची प्रतिक्रिया
नेमकं काय घडलं?
Rohit Pawar on Sunetra Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत जोरदार हालचाली सुरु आहेत. या पदासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित आहे. 26 फेब्रुवारी रोजी याबाबतची अधिकृत घोषणा होणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला होता. मात्र, आता रोहित पवारांनी या मुद्द्यावरुन टीका केलीये. "सुनेत्राकाकी राष्ट्रीय अध्यक्षा व्हाव्यात, यासाठी केवळ 35 आमदारांच्या सह्या आहेत. इतरांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा का दिला नाही?" असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केलाय. आधी सुनेत्रा पवारांच्या नावाला पाठिंबा देणारे रोहित पवार आता याबाबत शंका उपस्थित करत आहेत. त्यामुळे रोहित पवारांच्या मनात नेमकं काय आहे? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीये.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले, "सुनेत्राकाकी राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्यात असं नाही. 35 आमदारांनी सह्या केल्या आहेत, असं आम्हाला कळंतय. ते 35 आमदार कोण आहेत? त्या 35 आमदारांमधील एकाला जरी विचारलं तरी तुम्हाला याबाबत स्पष्टपणे सांगतील. सर्वच पदाधिकाऱ्यांनी सुनेत्राताईंच्या निवडीसाठी सह्या केल्यात, असं नाही. ठराविक मेजॉरिटीत पदाधिकाऱ्यांनी सुनेत्राकाकींसाठी सह्या केल्या आहेत. ज्यांनी सह्या केल्या आहेत, त्यांना तुम्ही विचारा. ज्यांनी सह्या केल्या नाहीत? त्या कशामुळे केल्या नाहीत? ते आमदार कोण आहेत. ते पदाधिकारी कोण आहेत? हा खरा संशोधनाचा विषय आहे.", असं रोहित पवार यांनी म्हटलंय.
दरम्यान, महाराष्ट्राच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत युती करुन निवडणूक लढली होती. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत आपली कामगिरी सुधारली होती. त्यांचे 41 आमदार निवडून आले होते. यातील बारामतीचे आमदार म्हणजे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झालंय.










