23 वर्षीय तरुणाने महिला कॉन्स्टेबलला ओढलं जाळ्यात, 24 लाख उकळले अन् भेटायला बोलवून...

एका 23 वर्षीय तरुणाने नवी दिल्लीतील एका महिला कॉन्स्टेबलला जाळ्यात ओढले. तिच्याकडून तब्बल 24 लाख रुपयेदेखील उकळले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तेवीस वर्षीय तरुणाने घातला गंडा

point

महिला पोलीस कॉन्स्टेबलकडून उकळले 24 लाख

Crime News : नवी दिल्लीतील बुराडी परिसरातून एका 23 वर्षीय तरुणाला महिला कॉन्स्टेबलची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. विक्रांत तोमर असे या आरोपीचे नाव असून, त्याने स्वतःला श्रीमंत उद्योगपती आणि क्रिकेटमधील मोठे प्रस्थ असल्याचे भासवून महिला पोलिसाला गंडा घातला. कॉन्स्टेबल शिवानी यांच्याशी त्याने प्रथम इन्स्टाग्रामवर संपर्क साधला आणि स्पोर्ट्स कोटा अंतर्गत होणाऱ्या दिल्ली पोलीस भरतीबाबत माहिती घेण्याच्या बहाण्याने संवाद वाढवला. पुढे व्हॉट्सअ‍ॅपवर हा संवाद घट्ट करत त्याने शिवानी यांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढले आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळण्याचे आश्वासन दिले.

तब्बल 24 लाख उकळले

या प्रलोभनाला बळी पडून पीडित कॉन्स्टेबलने आपली बचत, अ‍ॅक्सिस बँकेतून 12 लाखांचे वैयक्तिक कर्ज आणि ओळखीच्या लोकांकडून पैसे असे मिळून सुमारे 24 लाख रुपये तरुणाला ट्रान्सफर केले. यातील सुमारे 8 लाख रुपये बेटिंग प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या बँक खात्यात वळवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एवढेच नव्हे तर, एका प्रत्यक्ष भेटीदरम्यान आरोपीने विनयभंगाच्या उद्देशाने कॉन्स्टेबलच्या पाठीला अयोग्य पद्धतीने स्पर्शही केला होता. 

हे ही वाचा : मुंबईची खबर : बीएमसी करणार विहिरींचे पुनरुज्जीवन, प्रत्येक विहीरीसाठी 5 लाख रुपयांचा खर्च; काय आहे प्लॅन?

एक कार अन् वेगवेगळ्या महिला

आरोपी विक्रांत तोमर इन्स्टाग्रामवर महागड्या गाड्या आणि विलासी जीवनशैलीचे व्हिडिओ पोस्ट करून स्वतःला श्रीमंत असल्याचे भासवत असे. महिलांना प्रभावित करण्यासाठी तो आठ तासांच्या अवधीसाठी महागड्या लक्झरी कार भाड्याने घेत असे आणि याच एकाच कारमधून वेगवेगळ्या महिलांना फिरवून तो श्रीमंतीचा आव आणत असे. विशेष म्हणजे, आरोपीची लिव्ह-इन पार्टनर देखील दिल्ली पोलिसातच महिला कॉन्स्टेबल असून, तिच्याच माध्यमातून तो तिच्या बॅचच्या इतर महिलांची माहिती मिळवून त्यांना लक्ष करत असावा, असा संशय पोलिसांना आहे. एकाच बॅचच्या सुमारे २० महिलांना अशा प्रकारे लक्ष्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, पोलीस इतर पीडितांचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा : बीडच्या 13 वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन

यापूर्वी 5 गुन्हे दाखल

विक्रांत तोमरवर यापूर्वीच दिल्लीतील मायापुरी, हरी नगर, इंद्रपुरी आणि पूर्व जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे पाच गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात यापूर्वी तो जून महिन्यात जामिनावर तुरुगांतून बाहेर आला होता. मध्य जिल्हा सायबर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असून, फसवणुकीची व्याप्ती किती आहे आणि यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. बँक खात्यांचे व्यवहार आणि आर्थिक दस्तऐवजांची छाननी करून लुटलेली एकूण रक्कम आणि पीडितांची अचूक संख्या निश्चित करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.