सध्या घटस्फोटाचं प्रमाण का वाढतंय? प्रेमानंद महाजारांनी दिलं उत्तर...

मुंबई तक

प्रेमविवाहांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना घटस्फोटाची प्रकरणेही त्याच वेगाने वाढत असल्याचं देखील समोर येत आहे. प्रसिद्ध वृंदावन निवासी प्रेमानंद महाराज यांनीही या मुद्द्यावर आपले विचार मांडले आहेत.

ADVERTISEMENT

प्रेमविवाहांबाबत प्रेमानंद महाराज काय म्हणाले?
प्रेमविवाहांबाबत प्रेमानंद महाराज काय म्हणाले?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"प्रेमविवाह करतात आणि नंतर घटस्फोटाबद्दल बोलतात..."

point

सध्याच्या प्रेमविवाहांबाबत प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

Premanand Maharaj: सध्याच्या काळात, प्रेमविवाह म्हणजेच लव्ह मॅरेज अगदीच सामान्य बाब ठरत आहे. आता, लोकांना केवळ परंपरा नव्हे तर आपली आवड देखील तितकीच महत्त्वाची वाटते. प्रेमविवाहाच्या वाढत्या प्रमाणाचं देखील हेच कारण असल्याचं सांगितलं जात आहे. विशेषत: आजची तरुण पिढी नात्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात अधिक स्वतंत्र होत असल्याचं पाहायला मिळतं. 

प्रेमानंद महाराजांचं प्रेमविवाहाबाबत मत... 

परंतु, प्रेमविवाहांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना घटस्फोटाची प्रकरणेही त्याच वेगाने वाढत असल्याचं देखील समोर येत आहे. कारण, सध्या नातेसंबंध केवळ दिखाव्यासाठी राखले जातात. प्रसिद्ध वृंदावन निवासी प्रेमानंद महाराज यांनीही या मुद्द्यावर आपले विचार मांडले आहेत. प्रेमानंद महाराजांनी याबाबत काय सांगितलं? सविस्तर जाणून घ्या. 

सुप्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांनी संबंधित प्रकरणात आपले विचार मांडताना सांगितलं की, "प्रेमविवाह करता आणि नंतर घटस्फोट घेण्याबद्दल बोलता. लव्ह मॅरेज म्हणजेच प्रेम. जर कोणी तुम्हाला प्रेमाने स्वीकारलं तर तो आयुष्यभर तुमच्यासोबत राहील आणि दुसऱ्या कोणाकडेही पाहणार नाही, हाच प्रेमविवाहाचा अर्थ आहे. आता असं घडतं की ज्या नात्यांमध्ये त्यांचे विचार जुळत नाहीत अशा नात्यांमध्ये मुला-मुलींना स्वातंत्र्य हवं असतं आणि म्हणूनच काही काळानंतर, ते वेगळे होण्याचा निर्णय घेतात." 

हे ही वाचा: शिवजयंतीच्या दिवशी 'या' राशींच्या मार्गातील अडचणी होणार दूर, ग्रहांचा दुर्मिळ योग!

प्रेमानंद महाराजांनी पुढे सांगितलं की, "मुलांचे आई-वडील आणि त्यांच्या संपर्कातील प्रत्येकालाच वाटू लागतं की जर दोघांनी आपल्या इच्छेनुसार प्रेमविवाह केला तर त्यांचे संबंधित अधिक मजबूत होती. कारण लव्ह मॅरेजचा निर्णय हा आपली आवड लक्षात घेऊन आणि समजुतीने घेतलेला असतो. संपूर्ण भविष्य हे त्या निर्णयावर अवलंबून असतं. पण, जेव्हा भावना डगमगतात, तेव्हा मन भटकू लागते आणि म्हणूनच नातेसंबंध बिघडतात."

हे वाचलं का?

    follow whatsapp