नवरा अन् मुलांना सोडून रिक्षाचालकासोबत मुंबईला पलायन, आता नाल्यात सापडला रुखसानाचा मृतदेह

उत्तर प्रदेशातून आपल्या प्रियकरासोबत पळून मुंबईला आलेल्या महिलेचा सांताक्रूझ येथे मृतदेह सापडला आहे. एका नाल्यात कुजलेल्या अवस्थेत तो मृतदेह सापडला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रुखसानाची भयावह प्रेमकहाणी!

point

सांताक्रूझमध्ये नाल्यात सापडला मृतदेह

Crime News : उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील सादकपूर येथील रहिवासी असलेली रुखसाना ही महिला जुलै 2026 मध्ये आपला पती व तीन मुलांना सोडून प्रेमी साकिबसोबत मुंबईला आली होती. मात्र, 26 सप्टेंबर रोजी ती सांताक्रूझ भागातून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाली. या घटनेनंतर सुमारे तीन आठवड्यांनी, म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळील नाल्यात रुखसानाची कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.

नवरा अन् मुलांना सोडून मुंबईत आली अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, रुखसाना आणि साकिब यांच्यात आधीपासूनच प्रेमसंबंध होते. मात्र, कौटुंबिक व सामाजिक बंधनांमुळे त्यांचा विवाह होऊ शकला नाही. रुखसानाचे कांठ येथे लग्न झाले असून तिला तीन मुलेही आहेत. परंतु, जुलै 2026 मध्ये ती पुन्हा एकदा साकिबच्या संपर्कात आली. कुटुंबीयांनी तिला परत आणण्याचा प्रयत्न केला, तरी तिने पती व मुलांसोबत राहण्यास नकार दिला आणि ती साकिबसोबत मुंबईत निघून आली. साकिब मुंबईत रिक्षा चालवण्याचे काम करतो. काही दिवसांनंतर साकिबची पत्नीही मुंबईत राहू लागल्याने त्यांच्यात गृहकलह व तणाव वाढू लागला होता.

हे ही वाचा : सुनेत्रा पवार राज्याच्या अर्थमंत्री होणार? राष्ट्रवादीची बैठक अन् फडणवीसांच्या भेटीगाठी; काय घडतंय?

नाल्यात आढळला मृतदेह

याच वादातून 26 सप्टेंबर रोजी रुखसाना सांताक्रूझ परिसरातून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली. तिचा प्रेमी साकिब यानेच वाकोला पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. पोलीस तिचा सतत शोध घेत होते, परंतु अनेक दिवस तिच्याबाबत कोणताही सुगावा लागला नव्हता. अखेर 18 ऑक्टोबर रोजी वांद्रे भागातील नाल्यात तिचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच बिजनौरहून नातेवाईक मुंबईत पोहोचले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह मूळ गावी घेऊन गेले.

हे ही वाचा : मुंबईची खबर : समुद्र असूनही मुंबईतील हवा इतकी प्रदूषित का? पर्यावरण शास्त्रज्ञ काय सांगतात?

हत्या कुणी केली?

गावात मृतदेह पोहोचताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला असून संपूर्ण सादकपूर गावावर शोकाकुल कळा पसरली आहे. रुखसानाचे वडील इरफान यांनी साकिबवर आपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची हत्या केल्याचा थेट आरोप केला आहे. पीडित कुटुंबाने आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून न्यायाची मागणी केली आहे. सध्या मुंबई पोलीस हत्येमागचे नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी कसून तपास करत आहेत.