यशवंत बँकेच्या फलटण शाखेत ईडीचे छापे, 112 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी भाजपच्या नेत्याला बेड्या ठोकल्या
Karad News : कराडमध्ये बहुचर्चित असलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर याला मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं. काही काळापासून फरार असलेल्या चरेगावकरला पकडण्यात पोलिसांना चांगलं यश आले. या कारवाईमुळे सहकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चोरगावकरांच्या बंगल्यावर आणि यशवंत बँकेच्या फलटण शाखेत ईडीचे छापे
112 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचे धागेदोरे कुठपर्यंत?
Karad News : सकलेन मुलानी - कराडमध्ये बहुचर्चित असलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील आरोपी आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना मध्यरात्री पोलिसांनी अटक केली आहे. काही काळापासून फरार असलेल्या चरेगावकरला पकडण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : CM देवेंद्र फडणवीस विधानसभेत पुन्हा म्हणाले 'पुन्हा येऊ...', नेमकं काय घडलं?
चोरगावकरांच्या बंगल्यावर आणि यशवंत बँकेच्या फलटण शाखेत ईडीचे छापे
यशवंत बँकेत तब्बल 112 कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणी 12 ऑक्टोबर 2025 रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात सुमारे 50 हून अधिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल केल्यापासून चरेगावकर फरार होते, पोलिसांनी त्यांचा तपास केला. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ई़डीने देखील चरेगावकर यांच्या बंगल्यावर आणि यशवंत बँकेच्या फलटण शाखेत छापे टाकले.
सापळा रचून रेगावकरांना अटक
चरेगावकरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले. पोलिसांनी त्याचा दत्तक भाऊन विठ्ठल कुलकर्णीला अटक केली. मंगळवारी रात्री सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कराडजवळील विंग गावात सापळा रचून चारेगावकरांला ताब्यात घेतले.
हे ही वाचा : जालन्यात चालत्या ट्रकचे टायर निखळून दुचाकीवर आदळले, भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी अंत
112 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचे धागेदोरे कुठपर्यंत?
अटकेनंतर बुधवारी त्याला कराड येथील न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि प्रकरण लक्षात घेऊन न्यायालयाने शेखर चरेगावकरला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले. 112 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचे धागेदोरे कुठपर्यंत पसरलेत यात आणखी कोणाचा हात आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.










