मुंबईची खबर: मुंबईतील बहुप्रतिक्षित बेलासिस उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला... मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई तक

नुकतंच, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दक्षिण मुंबईतील बहुप्रतिक्षित बेलासिस उड्डाणपुलाचं ताडदेव येथे उद्घाटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह या फ्लायओव्हरचं उद्घाटन केलं.

ADVERTISEMENT

 बहुप्रतिक्षित बेलासिस उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला...
बहुप्रतिक्षित बेलासिस उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला...
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील बहुप्रतिक्षित बेलासिस उड्डाणपुल अखेर वाहतुकीसाठी खुला...

point

बेलासिस पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Mumbai News: नुकतंच, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दक्षिण मुंबईतील बहुप्रतिक्षित बेलासिस उड्डाणपुलाचं ताडदेव येथे उद्घाटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह या फ्लायओव्हरचं उद्घाटन केलं. याप्रसंगी मुंबईच्या महापौर रितू तावडे देखील उपस्थित होत्या. हे उड्डाणपूल आता वाहतुकीसाठी खुलं करण्यात आलं आहे. बेलासिस उड्डाणपुलाचा हा प्रोजेक्ट डेडलाइनच्या आधी पूर्ण झाल्याने चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय. जून 2024 मध्ये जुना पूल पाडण्यात आला होता आणि अवघ्या 15 महिने 6 दिवसांत हा फ्लायओव्हर नव्याने बांधण्यात आला. काही कारणास्तव, या फ्लायओव्हरचं औपचारिक उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं होतं. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देणार... 

ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रलला जोडणारा हा उड्डाणपुलावर आता बेलासिस हे नाव प्रामुख्याने घेतलं जाणार नाही. कारण, आता ताडदेवच्या बेलासिस पुलाचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं ठेवलं जाणार आहे. हा पूल ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडतो. दक्षिण मुंबईतील बेलासिस पुलाचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावर करण्याचा निर्णय झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी फडणवीस यांचे आभार मानले. 

हे ही वाचा: Govt Job: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी रेल्वे विभागाकडून नवी भरती! कोकण रेल्वेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी...

नव्या उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये 

या नवीन उड्डाणपुलाची एकूण लांबी 333 मीटर आहे, ज्यामध्ये रेल्वे रुळांवर 36.90 मीटरचा स्पॅन, 7 मीटर रुंद कॅरेजवे आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही बाजूंना रुंद फूटपाथ यांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 120 कोटी रुपये खर्च आला आहे. या पुलाचा पूर्वेकडील भाग 138.39 मीटर आणि पश्चिमेकडील भाग 157.39 मीटर आहे. तसेच, रेल्वे हद्दीत 36.90 मीटर आहे. रस्ता 7 मीटर रुंद असून दोन्ही बाजूंना रुंद फुटपाथ आहेत. 

हे ही वाचा: जालना: आधी झाडाखाली, नंतर ढाब्यावर... 5 जणांकडून भोळसर महिलेवर सामूहिक अत्याचार! न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

2024 मध्ये बेलासिस पूल पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आल्यामुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मुंबई मध्य पूर्व आणि पश्चिम दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अनेकदा 20 ते 30 मिनिटे विलंब सहन करावा लागत होता कारण त्या मार्गावरील वाहतूक ताडदेव आणि नागपाडा या गर्दीच्या रस्त्यांकडे वळवण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे, उड्डाणपुलाचं बांधकाम मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजित असताना, BMC ने हा प्रकल्प चार महिने आधीच पूर्ण केला.

हे वाचलं का?