Govt Job: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी रेल्वे विभागाकडून नवी भरती! कोकण रेल्वेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी...
'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून ट्रेनी अप्रेन्टिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून अप्रेन्टिसशिपच्या तब्बल 190 रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी रेल्वे विभागाकडून नवी भरती!
कोकण रेल्वेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी...
Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय रेल्वेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी रेल्वेच्या नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. 'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून ट्रेनी अप्रेन्टिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमातून अप्रेन्टिसशिपच्या तब्बल 190 रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. रेल्वेत नोकरीचं स्वप्न पाहणारे उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी konkanrailway.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 27 फेब्रुवारीपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून उमेदवार 20 मार्च 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा इंजीनिअरिंगची डिग्री असणं आवश्यक आहे. डिप्लोमाधारक उमेदवार सुद्धा कोकण रेल्वेच्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असणं अनिवार्य आहे. याचाच अर्थ, उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2001 ते 1 जानेवारी 2008 दरम्यान असणं आवश्यक आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: शेजारी राहणाऱ्या पुरुषासोबत महिलेचे अनैतिक संबंध... दोघांमध्ये वाद अन् आरोपीने थेट माय-लेकीचा जीव घेतला!
अर्जाचं शुल्क
कोकण रेल्वेच्या संबंधित भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागेल. ऑनलाइन माध्यमातून उमेदवार अर्जाचं शुल्क भरू शकतात. तसेच, सरकारी नियमांनुसार एससी (SC), एसटी (ST), महिला, अल्पसंख्याक आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही.










