सुनेत्रा पवारांच्या गैरहजेरीत झाला सगळ्यात मोठा निर्णय, प्रफुल पटेलांकडून राज्यसभेसाठी 'या' उमेदवाराची घोषणा
Parth Pawar candidate for Rajya Sabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. प्रफुल पटेल यांनी NCP च्या राष्ट्रीय अधिवेशनात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची आज (26 फेब्रुवारी) निवड करण्यात आली. मुंबईतील वरळीत आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवारांची घोषणा करण्यात आली आणि त्यांची एकमताने निवडही झाली. पण याच निर्णयानंतर एका आणखी मोठ्या निर्णयाची यावेळी घोषणा करण्यात आली आहे.
नुकतीच राज्यसभेची निवडणूक ही जाहीर झाली आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची एक जागा आहे. त्यामुळे याच जागेवर नेमकी कोणाला संधी मिळणार याबाबत बरेच दिवस खल सुरू होता. अखेर आजच्या राष्ट्रीय अधिवेशनात NCP चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष निवडीआधी NCP च्या कोअर कमिटीची काल (25 फेब्रुवारी) एक बैठक पार पडली. ज्यामध्ये राज्यसभेचा उमेदवार कोण असेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. याच बैठकीतील निर्णय हा प्रफुल पटेलांनी आज जाहीर केला. यावेळी प्रफुल पटेल यांनी जाहीर केलं की, 'आगामी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
प्रफुल पटेलांनी राज्यसभा उमेदवाराबाबत नेमकी काय घोषणा केली?
'एक महत्त्वाची सूचना मला आपल्या सगळ्यासमक्ष आणि या राष्ट्रीय अधिवेशनात करणं आवश्यक वाटतं. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी अत्यंत आत्मियतेने पण एका हिंमतीने सर्वांना अमूल्य मार्गदर्शन केलं आहे. मी त्यांचे आभार मानतो.'










