7 वीत शिकणाऱ्या मुलीला मोबाईलचं व्यसन, मोबाईल देण्यास बहिणीचा नकार, अखेर स्वत:ला संपवलं

मुंबई तक

Viral News : इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने मोबाईल फोनमुळे आपला जीव गमावला. तिच्या मोठ्या बहिणीने तिला मोबाईल फोन देण्यास नकार दिला होता. याच रागातून मुलीने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. या धक्कादायक प्रकरणातील मृत मुलीचं नाव प्राची (वय 14) असे आहे. या घटनेनं कुटुंब हादरून गेले आहे. 

ADVERTISEMENT

Viral News
Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बहिणीने फोन न दिल्याने धाकटी बहीण दुखावली

point

खोलीच्या दाराआड मृतदेह...

Viral News : उत्तर प्रदेशातील महोबा येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने मोबाईल फोनमुळे आपला जीव गमावला. तिच्या मोठ्या बहिणीने तिला मोबाईल फोन देण्यास नकार दिला होता. याच रागातून मुलीने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. या धक्कादायक प्रकरणातील मृत मुलीचं नाव प्राची (वय 14) असे आहे. या घटनेनं कुटुंब हादरून गेले आहे. 

हे ही वाचा : कल्याण: "आई-बाबा त्रास करून घेऊ नका..." बारावीच्या परीक्षेच्या भितीने 17 वर्षीय विद्यार्थीनीने संपवलं आयुष्य!

बहिणीने फोन न दिल्याने धाकटी बहीण दुखावली

संबंधित घटना महोबा जिल्ह्यातील कुलपहार पोलीस ठाणे परिसरात घडली. संबंधित मुलीने इयत्ता 7 वीचे शिक्षण सरु होते, तर तिची थोरली बहीण काजल ही बीएचे शिक्षण घेत होती. घटनेदरम्यान काजल तिच्या मोबाईल फोनवर अभ्यास पूर्ण करत होती, असे वृत्त आहे. तर तिची धाकटी बहीण प्राचीने तिचा फोन मागितला, पण काजलने फोन देण्यास नकार दिला. यामुळे प्राची दुखावली आणि रागाने तिच्या खोलीत गेली. 

खोलीच्या दाराआड मृतदेह...

बराच वेळ आतून आवाज न आल्याने आई आणि कुटुंबातील सदस्यांना काहीतरी अनुचित प्रकार घडल्याची भीती वाटली. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला तेव्हा सर्व घाबरून गेले होते. प्राचीचा मृतदेह लटकलेला आढळून आला होता. वडिलांना समजताच ते देखील हादरून गेले होते. 

हे ही वाचा : शिक्षकाने गोठ्यात नेऊन तिसरीच्या विद्यार्थिनीवर केले अत्याचार, गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर प्रकरणंही बाहेर

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, चर्चेचा विषय निर्माण झाला. या घटनेनं परिसरात शोककळा पसरल्याचे वृत्त आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp