धुळे महापालिका निवडणूक 2017 मध्ये भाजपची जोरदार मुसंडी, तर 2025-26 मध्ये काय होणार?
Dhule Muncipal Corporation : राज्यात धुळे महापालिकेच्या निवडणुकीची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. अशातच धुळे महापालिकेचा थोडक्यात इतिहास आणि अंतिम निकालाबाबतची माहिती जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धुळे महापालिका मतदारसंख्या :
धुळे महापालिका निवडणूक 2017 निकाल
Dhule Muncipal Corporation : राज्यात धुळे महापालिकेच्या निवडणुकीची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. अशातच धुळे महापालिकेचा थोडक्यात इतिहास आणि अंतिम निकालाबाबतची माहिती जाणून घेऊयात. दरम्यान, धुळे महापालिकेची स्थापना ही 30 जून 2003 मध्ये झाली होती. तसेच डिसेंबर 2023 पासून धुळे महापालिकेत प्रशासकातर्फे कामकाज चालवण्यात येत होतं. आता 16 जानेवारीनंतर धुळे महापालिकेचा कारभार आमदरांच्या हाती सोपवण्यात आला होता. तसेच धुळ्यातील महापालिकेची निवडणूक 19 वॉर्डच्या एकूण 74 नगरसेवकांच्या निवडीसाठी होणार आहे.
हे ही वाचा : कोल्हापूर हादरलं! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून
धुळे महापालिका मतदारसंख्या :
धुळे महापालिकेतील मतदारांच्या संख्येचा विचार केल्यास, प्रभाग क्रमांक 19 मध्ये 4 लाख 30 हजार 387 मतदान निश्चित झाल्याचं चित्र आहे. तसेच त्यातील 2 लाख 21 हजार 766 पुरुष, तर 2 लाख 8 हजार महिलांची संख्या आहे, तर 41 इतर मतदार असल्याचं बोललं जातंय.
तसेच सद्यास्थितीत धुळ्यात सात वर्षानंतर निवडणूक होणार आहे. अशातच या महापालिकेच्या विभागात 1 लाख 60 हजार नवमतदारांच्या नावांची भर पडलेली आहे. तसेच या निवडणुकीत 4 लाख 30 हजार 387 मतदारांना मतदानाचा हक्क बजावणात येणार आहे.
धुळे महापालिका निवडणूक 2017 निकाल
भाजप 50










