मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! आता UTS नाही तर 'या' अॅपवरून काढा ट्रेनचा पास; एकाच अॅपवर सर्व माहिती अन् सवलत सुद्धा...
नवीन वर्षाच्या सुरूवातीला दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे. डिजीटल सेवा अधिक सुलभ आणि इंटिग्रेटेड बनवण्याच्या दृष्टीने रेल्वेने एक नवं अधिकृत अॅप लॉन्च केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आता UTS नाही तर 'या' अॅपवरून काढा ट्रेनचा पास...
एकाच अॅपवर मिळवा सर्व माहिती
मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती
Mumbai News: नवीन वर्षाच्या सुरूवातीला दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे. डिजीटल सेवा अधिक सुलभ आणि इंटिग्रेटेड बनवण्याच्या दृष्टीने रेल्वेने रेल वन (RailOne) नावाचं एक अधिकृत अॅप लॉन्च केलं आहे. त्यामुळे, आता UTS मोबाईल अॅपवर मिळणारी 'मंथली पास'ची सुविधा रेल्वेने कायमस्वरूपी बंद केली आहे.
'वन नेशन', 'वन अॅप' या संकल्पनेला प्रोत्साहन
रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई लोकलसह उपनगरीय रेल्वेसाठी मासिक, त्रैमासिक आणि सहमाही पास आता केवळ रेल वन अॅपच्या माध्यमातूनच उपलब्ध होतील. आतापर्यंत प्रवाशांना तिकीट बुकिंग, जुन्या पासचं नूतनीकरण आणि ट्रेनच्या वेळांची माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या अॅप्सचा वापर करावा लागत होता. हाच गोंधळ टाळण्यासाठी आणि 'वन नेशन', 'वन अॅप' या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 'रेल वन (RailOne)' अॅप विकसित केलं गेलं आहे.
हे ही वाचा: Govt Job: अभियांत्रिकी क्षेत्रात मिळवा आकर्षक पगाराची सरकारी नोकरी! NALCO अंतर्गत मोठ्या पदांसाठी भरती...
रेल्वेच्या सर्व सुविधा एकाच छताखाली आणण्यासाठी 'रेल वन (RailOne)' या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. आगामी काळात तिकीट आणि पाससाठी हेच मुख्य माध्यम असणार आहे. इतकेच नव्हे तर, या अॅपच्या माध्यमातून ट्रेनची लाइव्ह स्थिती, प्लॅटफॉर्म नंबर, प्रवासाशी संबंधित माहिती आणि इतर बऱ्याच डिजीटल सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होतील.
हे ही वाचा: कल्याण: सासुने 60 वर्षीय मित्रासोबत मिळून केली सुनेची हत्या! संपत्ती आणि नोकरीच्या वादातून भयानक घटना
काय होणार फायदा?
यासंदर्भात, रेल्वे प्रशासनाने माहिती दिली की आता UTS च्या माध्यमातून नवे पास जारी केले जाऊ शकत नाहीत तसेच, जुन्या पासचं नूतनीकरण सुद्धा होऊ शकणार नाही. जर तुमच्याकडे आधीच UTS वरून काढलेला वैध पास असेल, तर घाबरण्याचं कारण नाही. तुमचे जुने पास त्यांची मुदत संपेपर्यंत वैध राहतील. मात्र, त्यानंतर पास काढण्यासाठी तुम्हाला 'रेल वन' अॅपच वापरावे लागेल. प्रवाशांना डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून रेल्वेने खास ऑफर दिली आहे. 'रेल वन' अॅपवरून तिकीट किंवा पास काढल्यास 3 टक्के सवलत मिळेल. ही सवलत 14 जानेवारी 2026 ते 14 जुलै 2026 पर्यंत लागू असेल.










