मधुचंद्राच्या रात्री नवऱ्यावर चाकूने हल्ला केला अन् काकासोबत पळाली नववधू, काकावर जडला होता जीव
Crime News : मधुचंद्राची रात्र म्हणजे नवरा आणि बायकोच्या नव्या आयुष्याची एक गोड सुरुवात. मात्र याच रात्री एका नवऱ्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. मधुचंद्राच्या रात्री एका नववधूने आपल्या पतीवर चाकूने हल्ला करुन जखमी केले आणि त्यानंतर घरातील लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. धक्कादायक म्हणजे, हा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिचा काकाच आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मधुचंद्राच्या रात्री नवऱ्यावर चाकूने हल्ला केला अन् काकासोबत पळाली नववधू
काकावर जडला होता जीव
Crime News : मधुचंद्राची रात्र म्हणजे नवरा आणि बायकोच्या नव्या आयुष्याची एक गोड सुरुवात. मात्र याच रात्री एका नवऱ्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. मधुचंद्राच्या रात्री एका नववधूने आपल्या पतीवर चाकूने हल्ला करुन जखमी केले आणि त्यानंतर घरातील लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. धक्कादायक म्हणजे, हा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून तिचा काकाच आहे. या घटनेमुळे पिरसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस परिसरातील ही घटना आहे.
हे ही वाचा : चेंबूरमध्ये इमारतीचं बांधकाम सुरु असताना सहाव्या मजल्यावरून सहा कामगार कोसळले, एकाचा करुण अंत
'मी मरेन नाहीतर तुला मारेन'
21 फेब्रुवारी रोजी या जोडप्याचा विवाह झाला होता. 22 फेब्रुवारीला नवरी आपल्या सासरी पोहोचली. मधुचंद्राच्या रात्री जेव्हा पती तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा तिने त्याला स्पर्श करण्यास मनाई केली. पतीने अधिक प्रयत्न केला असता, तिने रागाच्या भरात 'एक तर मी मरेन किंवा तुला मारीन' अशी धमकी दिली आणि चाकूने पतीच्या हातावर वार केला.
कुटुंबियांना दिले गुंगीचे औषध
पीडित पतीने सांगितले की, 'चाकूच्या हल्ल्यानंतर मी घाबरलो होतो आणि दुसऱ्या दिवशी तिच्या माहेरच्यांना बोलावून घेतले. त्यांनी तिची समजूत काढली, पण तिचा हेतू वेगळाच होता. तिसऱ्या दिवशी रात्री तिने जेवणात गुंगीचे औषध मिसळून संपूर्ण कुटुंबाला बेशुद्ध केले. आम्ही सर्वजण बेशुद्ध असताना ती घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन पसार झाली.'










