पुणे : अमेरिकेत शिकलेल्या अन् तगड्या पगाराच्या मुलाशी लग्न, पण 3 महिन्यातच तरुणीने इमारतीवरुन उडी मारून जीव दिला
Pune Crime News : फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, गंगासाठी तेजस बेंबळकर यांचे स्थळ सुचविण्यात आले होते. तेजस यांचे अमेरिकेत उच्च शिक्षण झाले असून ते पुण्यात आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. 17 मे 2025 रोजी कलबुर्गी येथे पाहणी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर 15 जून 2025 रोजी वाकड येथे साखरपुडा झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : अमेरिकेत शिकलेल्या अन् तगड्या पगाराच्या मुलाशी लग्न
पण 3 महिन्यातच तरुणीने इमारतीवरुन उडी मारून जीव दिला
Pune Crime News, पुणे : शहरात पुन्हा एकदा हुंडा छळाच्या आरोपामुळे नवविवाहितेच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे तीन महिने झाले असताना बाणेर परिसरातील राहत्या इमारतीवरून उडी मारून 27 वर्षीय विवाहितेने जीवन संपविल्याची घटना घडली. या प्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विवाहितेचे नाव गंगा तेजस बेंबळकर (वय 27, रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) असे आहे. तिचे वडील शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (वय 59, रा. कलबुर्गी, कर्नाटक) यांनी याबाबत फिर्याद दिलीये. या प्रकरणी पती तेजस शिवा बेंबळकर (वय 31), सासू उज्ज्वला शिवा बेंबळकर (वय 58), सासरे शिवा माणिकराव बेंबळकर (वय 62) आणि नणंद रिया शिवा बेंबळकर (वय 33) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, गंगासाठी तेजस बेंबळकर यांचे स्थळ सुचविण्यात आले होते. तेजस यांचे अमेरिकेत उच्च शिक्षण झाले असून ते पुण्यात आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. 17 मे 2025 रोजी कलबुर्गी येथे पाहणी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर 15 जून 2025 रोजी वाकड येथे साखरपुडा झाला.










