कल्याण डोंबिवली महानगरपालिका : 2015 मध्ये शिवसेनेने 53 तर भाजपने मिळवल्या होत्या 43 जागा, आता बिनविरोधचा ट्रेंड

मुंबई तक

Kalyan Dombivli Municipal Corporation Election : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत मतदान होण्याआधीच भाजप–शिंदेसेना महायुतीने निर्णायक आघाडी घेतल्याचे संकेत मिळत आहेत. कारण महायुतीचे तब्बल 19 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

ADVERTISEMENT

Kalyan Dombivli Municipal Corporation Election
Kalyan Dombivli Municipal Corporation Election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कल्याण डोंबिवली महानगरपालिका : 2015 मध्ये शिवसेनेने 53 तर भाजपने मिळवल्या होत्या 43 जागा

point

आता बिनविरोधचा ट्रेंड

 Kalyan Dombivli Municipal Corporation Election : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत मतदान होण्याआधीच भाजप–शिंदेसेना महायुतीने निर्णायक आघाडी घेतल्याचे संकेत मिळत आहेत. कारण महायुतीचे तब्बल 19 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, काँग्रेस, मनसे तसेच काही अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या अनेक उमेदवारांना निवडणूक न लढवताच महापालिकेत प्रवेश मिळाला आहे. या 19 बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे 13 तर शिंदेसेनेचे 6 उमेदवार आहेत. एकूण 122 सदस्यसंख्या असलेल्या केडीएमसीत उमेदवारी अर्जांची छाननी सुरू होताच काही प्रभागांमध्ये बिनविरोध निवडीचे चित्र स्पष्ट होऊ लागले होते. दरम्यान, महायुतीसमोर उभे असलेले उद्धवसेना आणि मनसेचे काही उमेदवार एकामागोमाग एक निवडणूक रिंगणातून बाहेर पडल्याने आतापर्यंत महायुतीच्या 19 जागा थेट बिनविरोध जिंकल्या गेल्या आहेत.

2015 मध्ये कोणी मारली होती बाजी?

शिवसेना (एकत्रित) : 53

भाजप : 43

मनसे : 9

हे वाचलं का?

    follow whatsapp