अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवेंची समृद्धी महामार्गावर झाली भेट, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Abdul Sattar and Ambadas Danve : अब्दुल सत्तार यांनी भाजपवर आरोप करुन शिवसेनेच्या विलीनीकरणाची गरज असल्याचं बोलून दाखवली. त्यानंतर आज त्यांची समृद्धी महामार्गावर अंबादास दानवे यांच्याशी भेट झालीये.

ADVERTISEMENT

google news

Abdul Sattar and Ambadas Danve : माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत दोन्ही शिवसेनेच्या विलीनीकरणाची इच्छा बोलून दाखवली. सत्तार यांच्या या विधानाला ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. या राजकीय घडामोडींमुळे दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येतील का, या चर्चांना आता अधिकच उधाण आले आहे.

हेही वाचा : आई इकडे डान्समध्ये व्यस्त, तर तिकडे सावत्र बापाने दीड वर्षांच्या बाळासोबत...

या सर्व पार्श्वभूमीवर आता अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे यांची समृद्धी महामार्गावर अचानक भेट झाल्याची बातमी समोर आली आहे. आपल्या मार्गाने प्रवास करत असताना दोघांनीही आपापल्या गाड्या महामार्गाच्या कडेला थांबवल्या आणि काही वेळ चर्चा केली. ही भेट नियोजित होती की योगायोग, हे अद्याप स्पष्ट नसले तरी, विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच झालेली ही गळाभेट राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना जन्म देणारी ठरत आहे. या भेटीनंतर दोघेही नेते आपापल्या मार्गाने पुढील प्रवासासाठी निघून गेले, मात्र या भेटीचा अर्थ आता वेगवेगळ्या पद्धतीने लावत आहेत. 

हेही वाचा : 15 वर्षीय मुलीवर बापाचा बलात्कार, तीन वर्ष सगळं सहन केलं; कारण वाचून हादरुन जाल

हे वाचलं का?