डेक्क्न क्वीनचा 96 वा वाढदिवस, आजही प्रवाशांना अविरतपणे दिली जातेय सुविधा

मुंबई तक

Pune-Mumbai Deccan Queen : पुणे - मुंबई मार्गे धावणाऱ्या डेक्क्न क्वीनचा आज 96 वा वाढदिवस. 1 जून 1930 रोजी मुंबई - पुणे अशी ट्रेन सुरु करण्यात आली होती. भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन म्हणून या ट्रेनची ओळख आहे. गेल्या 96 वर्षात अविरतपणे ही ट्रेन प्रवाशांना सुविधा देत आहे.

ADVERTISEMENT

google news

Pune-Mumbai Deccan Queen : पुणे - मुंबई मार्गे धावणाऱ्या डेक्क्न क्वीनचा आज 96 वा वाढदिवस. 1 जून 1930 रोजी मुंबई - पुणे अशी ट्रेन सुरु करण्यात आली होती. भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन म्हणून या ट्रेनची ओळख आहे. गेल्या 96 वर्षात अविरतपणे ही ट्रेन प्रवाशांना सुविधा देत आहे. या ट्रेनमध्ये पहिल्यांदाच डायनिंग कार सुरु करण्यात आली. ही डायनिंग कार या ट्रेनची एकमेव खासियत आहे. या ट्रेनचे अनेक किस्से आहेत.

हे ही वाचा : 12 वर्षांची मुलगी लघुशंकेसाठी उठली, दोघांनी मिळून बंदुकीचा धाक दाखवत जंगलात...

डेक्क्न क्वीनचा 96 वा वाढदिवस

या ट्रेनमध्ये प्रवाशांना आरामदायक सीट्स असून स्वादिष्ट आहाराचा आनंद घेता येतो. ब्रिटीशांच्या काळापासून सुरू करण्यात आलेल्या या ट्रेनमध्ये डाइनिंगची देखील सुविधा आजही कायम पाहायला मिळते. या ट्रेनचा वेग सरासरी 105 किमी प्रति तास आहे, प्रवासात सह्याद्रीच्या नयनरम्य दृश्यांचा अनुभवही घेता येतो. मुंबईच्या कल्याण स्टेशनपासून येताना ही ट्रेन कधीच थांबत नाही, ज्यामुळे तिची गती आणि वेळेचे व्यवस्थापन उत्तम राखले जाते. ही सेवा प्रवाशांच्या पसंतीस पडते. ही ट्रेन मुंबई-पुणे मार्गावरील प्रमुख पर्यटक आकर्षणांपैकी एक आहे.

हे ही वाचा : सातारा : मातब्बर नेते डावलून भाजपची उमेदवारी मिळवली; धैर्यशील कदम आहेत तरी कोण?

ट्रेनमधील प्रवाशांना दर्जेदार सुविधा

संबंधित ट्रेन ही प्रीमियम सेवा म्हणून ओळखली जाते कारण यात प्रवास करणाऱ्यांना दर्जेदार सुविधा दिल्या जातात. डाइनिंग कारमुळे प्रवासाला अधिक आनंददायक बनवते. सह्याद्रीच्या पर्वतांच्या पार्श्वभूमीवर ही ट्रेन धावणं अगदीच खास अनुभूती देईल. डेक्कन क्वीनची सेवा अनेक दशकांपासून सुरू असून तिचे महत्त्व आजही कायम आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन सातत्याने सेवा सुधारण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?