वही आणण्यासाठी मुलगा शिक्षकाच्या घरी गेला, 24 तासांतच कालव्यात भयंकर
Crime News : रतनपूर कॉलनीतून एक 16 वर्षीय मुलाचा मृतदेह सुमारे 24 तासांनंतर एका कालव्यात आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास केला जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बहिणीची वही आणण्यासाठी शिक्षकाच्या घरी गेला
नंतर मृतदेह कालव्यात आढळला
Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरच्या पांकी पोलीस ठाणे परिसराच्या रतनपूर कॉलनीतून 16 वर्षीय मुलाचा मृतदेह सुमारे 24 तासांनंतर एका कालव्यात आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास केला जात आहे. संबंधित मुलगा हा वह्या आणण्यासाठी गेला होता, मात्र पुन्हा तो परतलाच नाही.
हे ही वाचा : मुंबई: मुलगा दुधासाठी रडत होता, वडिलांनी दिलं फेकून अन्.. स्वत: दारूच्या नशेत
बहिणीची वही आणण्यासाठी शिक्षकाच्या घरी गेला
या प्रकरणातील रतनपूर कॉलनीतील रहिवासी असलेला अनुभव शुक्ला, उर्फ सानू रविवारी सकाळी सुमारे साडे दहा वाजताच्या सुमारास सायकलवरून घरातून बाहेर पडला होता. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, तो आपल्या बहिणीची वही आणण्यासाठी शिक्षकांच्या घरी गेला होता. वही आणल्यानंतर तो घरी परतला. मात्र नंतर तो कुठेच दिसला नाही. बराच वेळ होऊन गेला मात्र, तो घरी परतला नाही. त्यानंतर कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला, पण कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला
मृतदेह आढळल्याच्या वृत्ताने कुटुंबात एकच गोंधळ उडाला. या प्रकरणात घटनास्थळी उपस्थित असलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा पूर्ण करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळ आणि परिसराची तपासणी सुरू करण्यात आली. पोलीस या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा : Astrology : गुरूचा कर्क राशीत प्रवेश, हंस महापुरुष राजयोगाची निर्मिती; 'या' राशींचे भाग्य बदलेल
पांकी पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश बिष्ट यांनी सांगितलं की, त्या किशोरवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला. सर्व बाबी विचारात घेऊन प्राथमिक तपास सुरू करण्यात आला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे अद्याप कारण स्पष्ट समोर आलेलं नाही. पोलिसांनी हे प्रकरण संशयास्पद मानून त्याच्या प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवाल आणि तपासाच्या निष्कर्षातून पुढील कारवाई केली जाईल.









